आमदार संजय गायकवाड मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर आमरण उपोषण करणार आहेत. मंत्रालयीन अधिकाऱ्यांना कंटाळून सत्तेतील आमदारावर उपोषण करण्याची वेळ आली आहे. मतदारसंघातील विकास कामांना मंत्रालयीन अधिकाऱ्यांकडून मंजुरात देण्यास दिरंगाई होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचं मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना पत्र. 12 सप्टेंबर पासून मंत्रालयाच्या सातव्या मजल्याच्या गच्चीवर उपोषण करण्याचा आमदार गायकवाड यांचा इशारा.
साताऱ्यातील पोवई नाक्यावर लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने "देवा भाऊ" असा उल्लेख असणाऱ्या होर्डिंगवरून अजितदादांचा फोटो गायब झाल्याचे दिसले. या होर्डिंग वर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो फडणवीस समर्थकांनी वापरला नसल्याने साताऱ्यात चर्चांना उधाण आले आहे.
मध्यरात्री वर्षा निवासस्थानावर महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपस्थित होते. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाची चर्चा झाल्याचं समोर आलेय.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे . मात्र अद्याप सरकारकडून तुपकर यांचे आंदोलनाची दखल घेतल्या गेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त होतोय. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती करावी, सोयाबीन, कापसाला दरवाढ द्यावी,अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्यावी यासह विविध मागण्या घेऊन रविकांत तुपकर हे 4 सप्टेंबरपासून सिंदखेड राजा येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. आंदोलनाला तिसरा दिवस उलटला मात्र सरकारकडून दखल घेतल्या गेली नाही. स्थानिक प्रशासनाने तुपकर यांना भेटून आंदोलन मागे घेण्याचा सल्ला दिलाय, मात्र तुपकर आपल्या मागण्यांवर ठाम आहे. परवा म्हणजे 8 तारखेला संपूर्ण राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलाय.
सोलापूर काँग्रेसकडून सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या 11 पैकी 6 जागांवर दावा करण्यात आला आहे. काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याकडे बैठकीत याबाबतची मागणी केली. शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या मागणीला काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील दुजोरा दिलाय.
लालबागच्या राजाला यावर्षी अंबानी कुटुंबीयांकडून वीस किलोचा सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आलाय. गुरुवारी मुंबईच्या लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन झालं. लालबागच्या राजाची मनमोहक अशी 14 फुटाची बाप्पाची मूर्ती यंदाच्या वर्षी मयूरासनावर विराजमान आहे. लालबागच्या राजाचं हे 91 वर्ष आहे. विशेष म्हणजे लालबागच्या राजावर यावर्षी वीस किलो सोन्याचा मुकुट पाहायला मिळतोय. ज्याची किंमत तब्बल 15 कोटी रुपये आहे.
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी आज भाजपचा जाहीरनामा प्रकाशित होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते दुपारी ३ वाजता जाहीरनाम्याचं प्रकाशन होणार आहे. जाहीरनाम्यात काश्मीरमध्ये पर्यटनाला चालना देण्यावर विशेष लक्ष देण्याची शक्यता आहे.
सोबतच काश्मिरी पंडितांच पुनर्वसन, काश्मिरी पंडितांच्या परतीसाठी ठोस योजना, काश्मिरी पंडितांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी ठोस पावले हे मुद्दे जाहीरनाम्यात असण्याची शक्यता आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर आली आहे. अमित शहा हे रविवारी रात्री मुंबईत येणार असून सह्याद्रीवर वास्तव्यास असतील, असे समजलेय. सोमवारी अमित शहा लालबागचा राजा, वर्षा निवासस्थान आणि वांद्रे येथील आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवास भेट देणार आहेत. अमित शहांच्या या मुंबई दौर्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्र भाजप नेत्याकडून आढावा घेण्याची शक्यता आहे.
मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेनं येणाऱ्या लेन वर ही वाहतूक कोंडी. गणेशोत्सवासाठी मुंबई वरून गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना ह्या वाहतुक कोंडीचा फटका. नागरिक मोठ्या प्रमाणात आपल्या गावी चालल्यामुळे पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर वाहतुकीचा ताण बोरघाट पोलीस ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबईहून येणाऱ्या आणि पुण्याहून जाणाऱ्या दोनही लेन वरून वाहतूक सुरू करून ही कोंडी फोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न.
आरटीओ अधिकाऱ्याकडून 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष कासम मुलाणी याला नेरुळ पोलीसांनी रंगेहाथ पकडलेय. आरटीओ अधिकाऱ्याच्या कामाच्या ठिकाणी येऊन विडिओ शूटिंग काढून तुमच्या विरोधात तक्रार करुन धंद्याला लावण्याची धमकी कासम मुलाणी देत होता. तक्रार न करण्यासाठी 2 लाख रुपये आणि प्रतिमहिना 20 हजार रुपयांची खंडणी कासम मुलाणी यानी मागितली होती. याप्रकरणी नेरुळ पोलीसांनी सापळा रचत 20 हजार रुपयांची खंडणी स्वीकारताना कासम मुलाणी याला रंगेहात पकडलेय.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आजपर्यंत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात १ कोटी ५९ लाख भगिनींना ४७८७ कोटींचा लाभ देण्यात आला आहे अशी माहिती राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. जुलै आणि ऑगस्ट अशी एकत्रित ३ हजार रुपयांची रक्कम डीबीटी द्धारे थेट खात्यात जमा करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.