Top 10 Headlines: आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा, लाडकी बहीण योजनेवरून श्रेयवाद; वाचा टॉप १० हेडलाइन्स

Today's Top 10 News Headlines: महाराष्ट्रासह देशातील महत्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा
top 10 headlines
Top 10 Marathi News Headlinestop 10 headlines
Published On

भाजपचा अंतर्गत सर्व्हे, अजित पवारांना फक्त ११ जागा मिळणार, रोहित पवारांचा मोठा दावा

एका अंतर्गत सुत्राने दिलेल्या माहितीनुसार परवाच भाजपचा अंतर्गत सर्व्हे आलाय. त्यामध्ये अजितदादांच्या गटाला ७-११ जागा, शिंदे साहेबांच्या गटाला १७-२२ जागा आणि भाजपला ६२-६७ जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत गोटात भीती पसरलीय. यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत.

भाजपच्या एका मोठ्या केंद्रीय नेत्याने परवा अजितदादांना काही ठराविक जागा ऑफर केल्या असून अजितदादांनी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात मोठे नेते उभे केले किंवा अपक्ष उभे करण्याची तयारी दाखवली तर ६ ते ७ जागा अतिरिक्त देण्याचीही ऑफर दिलीय.

लाडकी बहीण योजनेवरून श्रेयवाद

महायुतीमध्ये लाडकी बहीण योजनेवरून श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. वांद्र्यात भाजपने लावलेल्या बॅनरवरुन अजित पवारांचा फोटो गायब झाला आहे. या बॅनरवर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे फोटो आहेत. भाजपकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो नसल्याने आता भाजपलाही अजितदादा नकोसे झालेत का ? चर्चेला उधाण आले आहे.

८ जिल्ह्यात कांदा घोटाळा, जास्त क्षेत्रावर विमा उतरवला!

नाशिक, धुळे, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड या आठ जिल्ह्यात कांदा पीक विमा उतरण्यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा संशय आहे. त्यामुळे या तीनही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षकांना पत्र पाठवून तपासणी करण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयाने केले आहेत. जितकी लागवड कांद्याची आहे, त्यापेक्षा तीन ते चार पट क्षेत्रावर विमा काढण्यात आलाय. त्याबाबत कृषी आयुक्तालयाने आठही जिल्ह्याच्या जिल्हा कृषी अधीक्षकांना पत्र लिहून तपासणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

रवींद्र चव्हाण नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार

काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षाची पहिलीच जिल्हा स्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसा ठराव स्थानिक काँग्रेस पक्षाच्या बैठकीत घेण्यात आलाय.हा ठराव प्रदेश आणि केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीने दिलीय.

माझ्या घरी कधीही सीबीआयची रेड, अटक होण्याची शक्यता

चार वर्षांपूर्वीची केस उकरून काढून देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. मी पोलिसांवर दबाव टाकून गिरीश महाजनवर कारवाई केल्याचा आरोप आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने कधीही माझा घरी रेड होऊ शकते, मला कधीही अटक होऊ शकते. फडणवीस यांनी एजन्सी आणि वरिष्ठ लोकांची मदत घेऊन हे करत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांना सांगू इच्छितो तुम्हाला जे कारवाई करायची आहे त्यासाठी मी तयार आहे, असे अनिल देशमुख म्हणाले.

आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या पिठासमोर सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना अपात्र केलं नव्हत म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली होती. तर, अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना अपात्र केलं नाही म्हणून शरद पवार यांच्या पक्षाकडून जयंत पाटील यांनी याचिका दाखल केली होती.

रेशन दुकानात आनंदाचा शिधा नाही

पुणे शहरात रेशन दुकानात आनंदाचा शिधा नाही. गणपती उत्सवाचे तीन दिवस उलटले तरी आनंदाचा शिधा अजून दुकानदारांना मिळाला नाही. धान्य वेळेवर येत नसल्याने दुकानदार पण नाराज आहेत. दुकानावर नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. शिद्यातील वस्तू गोडाऊनला आल्यात, आठवड्यात वाटप पूर्ण होईल आशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. आठवड्याच्या अखेरीस नेहमीच्या धान्य वाटपाला सुरुवात होईल, असेही सांगण्यात आलेय.

भंडारा जिल्ह्याला रेड अलर्ट जारी

भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाने आज रेड अलर्ट जारी केला आहे. काल रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 25 दरवाजे 0.5 मिटर ने उघडण्यात आले असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर पावसाची संततधार अशीच कायम राहिली तर आणखी पाणी सोडण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर : घाटी कर्मचाऱ्यांना ड्रेस कोडशिवाय आता नो एन्ट्री, आयकार्डही बंधनकारक

छत्रपती संभाजी नगरच्या घाटी रुग्णालयात x-ray विभागातील तरुणीचा विनयभंग आणि वार्डातील कर्मचाऱ्यांनी परस्पर बदली कर्मचारी कामावर ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर घाटी प्रशासनाने आता कठोर पावल उचलायला सुरुवात केलीय. त्यामुळे आता घाटी कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड शिवाय एन्ट्री नसेल शिवाय आयडी कार्ड देखील असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळं रुग्णांशी गैरवर्तनाचा किंवा विनयभंगाचा प्रकार घडल्यास वार्ड प्रमुख आणि विभाग प्रमुख सर्वस्वी जबाबदार राहतील असा निर्णय घाटी प्रशासनाने घेतलाय. दरम्यान काही दिवसांपूर्वी घाटी रुग्णालयात बाहेरचे कर्मचारी कामावर ठेवले जात असल्याची बातमी साम टीव्ही ने दाखवली होती त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आणि तात्काळ हा निर्णय घेतला.

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर अपघात, एक ठार

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर आज पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात एक प्रवासी ठार तर चालक जखमी झाला. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर खालापूर जवळ माडप बोगद्यात खासगी बसने पुढे चाललेल्या पीक अप व्हॅनला धडक दिली आणि बोगद्याच्या भिंतीला धडकली. बचाव पथकांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला घेवून वाहतूक सुरळीत केली आहे. अपघातात बसच्या समोरील बाजूचे नुकसान झालंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com