किमान निर्यात मूल्य रद्द झाल्यानंतर देखील कांदा व्यापारी आणि निर्यातदारांचे हाल सुरु आहेत. निर्णय झाल्यानंतर देखील सिस्टीम अपडेट न झाल्याने लाखो टन कांदा बॉर्डर वर अडकला आहे. बांगलादेश बॉर्डर वर 100 ट्रक अडकले आहेत. तर मुंबई पोर्ट वर देखील 300 कंटेनर अडकून पडले आहेत.
नाशिकच्या जनोरीमध्ये देखील निर्यातीसाठीसाठी जाणाऱ्या 70-80 अडकले आहेत. सिस्टीम अपडेट नसल्याने कस्टम चे कागदपत्र तयार करण्यास अडचण होत आहे. जहाज निघून गेल्यास लाखो टन कांदा सडून जाण्याची भीती आहे. केंद्रीय पातळीवरून हस्तक्षेप करण्याची कांदा निर्यातदारांनी मागणी केली.
नागपुरातील धरमपेठमध्ये गणरायाला सरकारी अधिकाऱ्यांना सदबुद्धी देण्यासाठी बॅनर लावून साकडे घालण्यात आलं आहे. सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराचे विघ्न दूर होऊ दे..सर्वसामान्य नागरिकांची काम सहज होऊ दे...
भ्रष्टाचारामुळे नागरिकांची होणारी लुबाडणूक फलकातून लक्ष वेधत आहे. हे गणराया महापालिका, एनआयटी, आरटीओ, नगरभूमापन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर सरकारी कार्यालयातून भ्रष्टाचाराचे अड्डे बनले आहे असा संदेश या बॅनरमधून देण्यात आला आहे. हे बॅनर येणाऱ्या जाणाऱ्याचे सहज लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे सध्या या बॅनरची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा ९७ टक्क्यांवर पोहचला आहे. तर गंगापूर धरण समूहात देखील ९७.०२ टक्के पाणीसाठा झाला आहे. नाशिककरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. जिल्ह्यातील २४ पैकी ११ धरणं ओव्हर फ्लो तर उर्वरित धरणांमध्ये देखील ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी आहे. जिल्ह्यातील २४ लहान मोठ्या धरण प्रकल्पांमध्ये ९७.११ टक्के पाणीसाठा
कोल्हापुरात चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांना जमावाकडून मारहाण करण्यात आली. शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे हॉटेलमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यांना ग्रामस्थांनी चोप दिला. रात्री हॉटेलमध्ये चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांना ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडलं. त्यानंतर चोपलेय. तीन पैकी एक चोरट्या ग्रामस्थांच्या हाती लागला चोरट्याकडे धारदार शस्त्र असल्याने चोरट्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.
नागपूर शहरातील 30 हजार श्वानांची नसबंदी केल्याचा दावा नागपूर महानगरपालिकेने नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या शपथपत्रातून केला आहे. श्वानाची वाढती संख्या नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यासाठी तीन एजन्सीची नेमणूक केली. एक सप्टेंबर पासून नागपुरात रेबीजमुक्त मिशन सुरू केले आहे यात 20000 मोकाट श्वानांचे लसीकरण केले जाईल असे प्रतिज्ञापत्रात म्हटले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी बिबट्याच्या दोन बछड्यांचे दर्शन झाले. यामुळे शाळेत येणारे विद्यार्थी महिला व नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्या मानवी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांचा जीव गेलाय. आता भोरमध्ये बिबट्या दिसून आलाय.
ई-पीक पाहणी काही कारणात्सव करता आली नसेल तर शेतकऱ्यांसाठी चांगली संधी चालून आली आहे. ई-पीक पाहणीला आता ८ दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. आता अंतिम मुदत २३ सप्टेंबरपर्यंत असून ई-पीक पाहणी इंटरनेटशिवाय देखील करता येणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख अर्ज आले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत आलेल्या एक कोटी साठ लाख महिलांना दोन महिन्याचे लाभ दिला आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत आलेल्या अर्जांची छाननी सुरू आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत या योजनेअंतर्गत दोन कोटी पेक्षा अधिक महिला पात्र ठरतील.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्यानी अर्ज भरले होते, त्यांना जुलै आणि ऑगस्टनंतर सप्टेंबर महिन्याचा लाभही लवकरच दिला जाईल. सप्टेंबर महिन्यात आलेल्या पात्र अर्जांनाही या महिन्यात लाभ मिळेल.
अमरावतीच्या ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने परतवाडा ते घटांग मार्गावरून अवैध गुटख्याची तस्करी करणारी कार जप्त केलीय. कारमधून २ लाख ४ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा हस्तगत करण्यात आलाय.. जप्त करण्यात आलेला अवैध गुटखा हा परतवाड्याला आणला जात होता..या प्रकरणी सुरज राजकुमार तेजवानी, गोपाल राजकुमार तेजवानी या दोन संख्या भावांना पोलिसांनी अटक केली आहे.
नाशिकहून दिल्ली नोएडाकडे महिंद्रा कंपनीच्या थार गाड्या घेऊन जाणाऱ्या कंटेनरला धुळे शहराजवळ हॉटेल रेसिडेन्सी समोर उड्डाणपूलाखाली अचानक आग लागली. कंटेनर चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे सुदैवाने जीवितहानी टळली आहे. कंटेनर चालकाने तात्काळ कंटेनर रस्त्याच्या कडेला उभे करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. परिसरातील नागरिकांनी देखील धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशमन विभागाचे पथक काही वेळातच पोहोचल्याने अग्निशमन विभागाने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
मुंबई आग्रा महामार्गावरून लळींग टोलनाक्या पासून काही किलोमीटर अंतरावरच या कंटेनरला अचानक आग लागली. या कंटेनर मधून थार या वाहनांची वाहतूक केली जात होती, कंटेनरला आग कशामुळे लागली अद्याप याचे कारण समजू शकले नसले तरी या आगीमध्ये कंटेनर चे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नाशिक-छत्रपती संभाजी महामार्गावर येवला त्लूक्यातील काळमाथा जवळ दोन कंटेनर एकमेकांना ओव्हरटेक करण्याचा नादात समोरून येणा-या मालवाहू पिकअप वाहनाला धडक बसून झालेल्या अपघातात पिकअप चालक जागीच ठार झाला तर एक जण गंभीर झाला. सुभाष रावसाहेब भोसले असे मृत झालेल्या वाहन चालकाचे नाव आहे. अपघातामुळे रात्री या मार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
जालन्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा भूखंड लिलाव रद्द करण्याच्या मागणीसाठी वडीगोद्रीतील दोन तरुणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. अंगावर डिझेल ओतून घेत तरुण शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय , बाजार समितीच्या जमीन संपादित झालेल्या स्थानिक शेतकऱ्यांना भूखंड राखीव ठेवावा अशी मागणी या तरुणांची होती. मात्र या मागणी कडे दुर्लक्ष करत बाजार समिती सदस्य मध्ये लिलाव सुरू होता, यावेळी शेतकरी आंदोलक शिवाजी काळे आणि अजिंक्य गावडे यांनी हा आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, यावेळी स्थानिक पोलीस आणि काही गावकऱ्यांनी या शेतकऱ्यांना रोखून धरले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.