Maharashtra Rain : राज्याच्या घाटमाथ्यावर तुफान पाऊस, पुणे- सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट; आज कुठे कसं हवामान?

Maharashtra : महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला असून कोकण, मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाच्या सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Maharashtra
MaharashtraSaam Tv
Published On
Summary
  • महाराष्ट्रात आज (२८ ऑगस्ट) मुसळधार पावसाचा अंदाज, घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट.

  • कोकण, विदर्भ, मराठवाडा जिल्ह्यांत जोरदार पावसाच्या सरींची शक्यता; उर्वरित राज्यात येलो अलर्ट.

  • सिंदेवाही येथे तब्बल १११ मिलिमीटर पावसाची नोंद, नागपूरात उच्चांक तापमान ३२.८ अंश सेल्सिअस.

  • पुढील आठवड्यात पावसाचा जोर वाढणार; शेतकऱ्यांना दिलासा, पण अतिवृष्टीचा धोका कायम.

हवामान विभागाने आज राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी दक्षतेचे इशारे दिले आहेत. विशेषतः मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरील भागांत मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरील भागांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे या भागांत राहणाऱ्या नागरिकांना तसेच प्रवास करणाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाच्या सरींची शक्यता वर्तवली आहे. या भागांत गेल्या काही दिवसांपासून रिमझिम सरी सुरू आहेत; मात्र आजपासून पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. मध्य महाराष्ट्रातील नाशिक घाटमाथा तसेच मराठवाड्यातील जालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांतही मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

Maharashtra
Mosoon Update | महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचा तडाखा ,जनजीवन विस्खळीत...

विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय राज्यातील बहुतांश भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्र वगळता उर्वरित राज्यात येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

Maharashtra
Monsoon sports injuries: पावसाळ्यात मुलांमध्ये वाढतोय ऑर्थोपेडिक दुखापतींचा धोका; काळजी घेण्याचं तज्ज्ञांचं आवाहन

गेल्या काही दिवसांपासून मॉन्सून काहीसा ढासळलेला होता; मात्र बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाला पुन्हा चालना मिळाली आहे. कोकण किनारपट्टीसह घाटमाथ्यावर या कमी दाबाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवतो आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पूर्व विदर्भात जोरदार पावसाची नोंद झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे तब्बल १११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय नागपूर शहराने राज्यातील उच्चांक तापमानाची नोंद केली असून बुधवारी तेथे ३२.८ अंश सेल्सिअस तापमान होते.

Maharashtra
Pune Weather Update : पुण्यात मुसळधार पावसाचा कहर, एकता नगर पाण्याखाली, भिडे पूल वाहतुकीसाठी बंद

हवामान तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये मुसळधार सरींचा इशारा देण्यात आल्यामुळे खबरदारी घेणे नागरिकांसाठी अत्यावश्यक ठरणार आहे. विशेषतः सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून अधिक जोमाने सक्रिय होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com