Today's Marathi News Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या काश्मीर दौरा

Maharashtra Latest News and Update in Marathi (6 March 2024): राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा.
Today Live Batmya in Marathi (6 March 2024) | Latest Update on Manoj Jarange Patil, Loksabha Election, Amit Shah, Maha Yuti, MVA and Overall Maharashtra
Today Live Batmya in Marathi (6 March 2024) | Latest Update on Manoj Jarange Patil, Loksabha Election, Amit Shah, Maha Yuti, MVA and Overall MaharashtraSaam Tv
Published On

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या काश्मीर दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या काश्मीर दौरा

कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच काश्मीरमध्ये

पंतप्रधान मोदी हे उद्या श्रीनगरमध्ये विकास प्रकल्पांचे अनावरण करतील

त्यानंतर मोदींची जाहीर सभा होणार

पंतप्रधान मोदी श्रीनगरमधील बक्षी स्टेडियममध्ये डेव्हलप इंडिया डेव्हलप जम्मू आणि काश्मीर कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

केंद्रशासित प्रदेशातील कृषी-अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जवळपास ५ हजार कोटी रुपयांच्या योजनांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार

मोदींच्या सभेला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थित राहावे. भाजप कार्यकर्त्यांकडून आवाहन

विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाविरोधातील याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी

एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या आमदारांना अपात्र करण्याची केली होती विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे मागणी

मागच्या सुनावणीवेळी कोर्टाने एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या आमदारांना नोटीस पाठवली होती

त्यावर उद्या एकनाथ शिंदे यांच्याकडून उत्तर दाखल केल जाईल

या प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार की सुप्रीम कोर्टात हे ७ उद्या स्पष्ट होण्याची शक्यता

सुप्रीम कोर्ट उद्या काही निर्देश देत का हे पाहणे महत्वाचं

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा तयार

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा तयार

जाहीरनामा समितीने जाहीरनाम्याची प्रत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सोपवली

समितीचे अध्यक्ष पी चिदंबरम यांच्यासह इतर सदस्य उपस्थित

पुढील आठवड्यात होणाऱ्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत जाहीरनाम्याला मंजुरी दिली जाणार

महायुतीचा फॉर्म्युला दिल्लीत निश्चित होणार

महायुतीचा फॉर्म्युला दिल्लीत निश्चित होण्याची शक्यता आहे.

राज्यात त्यात्या पक्षाचं जागावाटप निश्चित झाल्यावर दिल्लीत पुन्हा बैठक

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत राज्यातील नेते बसून निर्णय घेणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार

खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण

खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा थरार लातूरच्या उदगीर येथे 8 मार्चपासून रंगणार आहे. दरम्यान आज या स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांच्या हस्ते करण्यात आले. तर राज्यभरातून 360 कुस्तीगीरांचा समावेश असलेली ही स्पर्धा फ्रिस्टाईल,ग्रिकोरोमन, महिला गटात होईल. तर 34 लाख रूपयांची बक्षीसे हे कुस्ती स्पर्धा विजेत्यांना दिली जाणार आहे.

...म्हणून विरोधकांच्या पोटात दुखतंय; CM एकनाथ शिंदेंचा टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमो महारोजगार मेळाव्यात विरोधकांवर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'महाराष्ट्राचा विकास वेगाने होतोय म्हणून विरोधकांच्या पोटात दुखतंय. 210 आमदार असलेलं स्ट्रॉंग सरकार आहे. रोज शिव्या शाप देताहेत ते लोकसभेनंतर घरी बसतील'.

युवक काँग्रेसचं मंत्रालयाबाहेर अचानक आंदोलन, पोलिसांची पळापळ

महाराष्ट्र युवक काँग्रेसने आज मुंबईच्या मंत्रालयाबाहेर अचानक आंदोलन सुरू केल्याने पोलिसांची पळापळ झाली. इलेक्ट्रिक बॉन्ड सार्वजनिक करा ही मागणी करत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केले. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत हे या आंदोलनत सहभागी झाले होते. सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच मंत्रालयाबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात काय म्हणाले?

महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीनंतर बाळासाहेब थोरातांनी पहिली प्रतिक्रिया दिली. 'आजची बैठक सकारात्मक झाली. दोन दिवसात निर्णय होईल, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

प्रकाश आंबेडकरांची ९ मार्चला महाविकास आघाडीसोबत बैठक होणार

महाविकास आघाडीची नऊ तारखेला पुन्हा बैठक प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत होणार

अंतिम जागा नेमक्या किती? कोणत्या द्यायच्या? याबाबत बैठकीत निर्णय होणार आहे.

आज प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास १७ जागांवरील लोकसभा मतदारसंघावर चर्चा केली.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना काही जागा अदलाबदली करावी अशी भूमिका मांडल्याची माहिती आहे.

बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांवर आणखी एक गुन्हा दाखल

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर पुन्हा एकदा बीडमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी मनाई आदेश जारी केलेला आहे.

NDA Seat Sharing: महायुतीचं ठरलं ! पुढील ४८ तासांत जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर होणार अंतिम निर्णय

भाजप विद्यमान खासदारांच्या जागा भाजप मित्र पक्षांना सोडणार आहे. येत्या ४८ तासात महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय होणार आहे. सर्वेक्षणानंतर शिवसेनेला १५ ते १६, तर राष्ट्रवादीला ५ ते ६ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आमदार बाबा अत्राम यांना लोकसभेची उमेदवारी द्या;कार्यकर्त्यांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गडचिरोली या लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत कॅबिनेट मंत्री आणि अहेरी विधानसभेचे विद्यमान आमदार बाबा अत्राम यांना उमेदवारी द्या, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून या बैठकीत करण्यात आली आहे.

माजी नगरसेविका अनिता शेट्टी यांचा भाजपमध्ये प्रवेश

माजी नगरसेविका अनिता शेट्टी यांचा भाजपमध्ये प्रवेश

भाजपचे संयोजक विनय सहस्त्रबुद्धे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

अनिता शेट्टीचा काँग्रेसला रामराम

अनिता शेट्टी नवी मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका

माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांच्या अनिता शेट्टी पत्नी

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या गावभेट दौऱ्यात राडा

सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस संभाव्य उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या गावभेट दौऱ्यात चांगलाच राडा झाला. हा प्रकार मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथे आज सकाळी घडला.काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. त्यामुळे त्यांनी गावभेट दौऱ्याला सुरवात केली आहे. आज त्या मंगळवेढा दौऱ्यावर आल्या असता, त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. पाटखळ येथील मराठा समाज बांधवांनी गावभेट दौऱ्याला विरोध करत, बैठकीत राडा केला. यावेळी मराठा समाजाच्या तरुणांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या.

मनोज जरांगे पाटील यांनी पुढाऱ्यांना गाव बंदी करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार अनेक गावांमध्ये मराठा समाजाने राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. मराठा समाजाने केलेल्या गावबंदीचा फटका आज काॅंग्रेसच्या संभाव्य उमेदवार प्रणिती शिंदे यांना बसला. दरम्यान शिंदे यांनी बैठक न घेताच गावातून हताशपणे परतावे लागले. शिंदेच्या या बैठकीतील राड्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Shirur Lok Sabha Constituency: शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी आयात उमेदवार नको; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची वरिष्ठांकडे मागणी

शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी आयात उमेदवार नको

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बैठकीत कार्यकर्त्यांची वरिष्ठांकडे मागणी

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणुन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावाची चर्चा असताना कार्यकर्त्यांनी मात्र आयात उमेदवाराला नापसंती दर्शवली

कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांचा नावासाठी पक्षाकडे आग्रह

चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीसाठी माजी खासदार हंसराज अहिर इच्छुक

चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीबाबत माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री व माजी खासदार हंसराज अहिर यांनीही मैदानात उडी घेतली आहे. आपण या क्षेत्राचे चार वेळा खासदार राहिलो असल्याचे सांगत पक्षाने तिकीट दिल्यास आपण निवडणूक लढवू, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

कोल्हापूर : बोर्डाचे पेपर तपासणीवर 63 हजार शिक्षकांचा बहिष्कार

कोल्हापूर : बोर्डाचे पेपर तपासणीवर 63 हजार शिक्षकांचा बहिष्कार

निकाल लांबण्याची भीती

अंशतः अनुदानित शिक्षकांनी आपल्या मागण्यासाठी टाकला बहिष्कार

दहावी बारावीचे पेपर तापसणीवर बहिष्कार

शासन अनुदानाचा टप्पा वाढवत नाही तोपर्यंत बहिष्कार कायम ठेवण्याचा इशारा

Maharashtra Election 2024: सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला मिळावी, कार्यकर्त्यांची मागणी

सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला मिळावी, कार्यकर्त्यांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा मतदारसंघाच्या बैठकीत कार्यकर्त्यांची आग्रह

वरिष्ठांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष

डॉ. बी जी शेखर पाटील यांची पुन्हा नाशिकच्या पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती

नाशिकचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ बी जी शेखर पाटील यांची पुन्हा नाशिकच्या पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती झालीय. सेवानिवृत्तीला ३ महिने बाकी असताना आणि ३ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण नसताना गृह विभागाने केलेल्या बदली विरोधात डॉ बी जी शेखर पाटील यांनी कॅटमध्ये आव्हान दिले होते. कॅटने पाटील यांच्या बाजूने निकाल देत बी जी शेखर पाटील यांना पदभार देण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे कॅटचा निकाल येण्यापूर्वी घाईघाईने पदभार स्वीकारणाऱ्या दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती रद्द होणारय.

रविकांत तुपकरांकडून 'निर्धार परिवर्तन अभियानाची घोषणा

बुलढाण्याच्या चिखली येथील मौनीबाबा संस्थानात रविकांत तुपकरांच्या घाटावरील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी व समर्थकांची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली, यावेळी रविकांत तुपकरांनी 'निर्धार परिवर्तन अभियाना'ची घोषणा केली, या अभियानाअंतर्गत ७ मार्च पासून पुढील ८ दिवस रविकांत तुपकरांचे शिलेदार लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जावून गावातील प्रत्येक नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

अमित शहा यांच्या उपस्थितीत जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता

अमित शहा यांच्या उपस्थितीत जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता

मुख्यमंत्री यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री सह्याद्रीवर

मंत्री चंद्रकांत पाटील देखील आहे सह्याद्रीवर

Today Live Batmya in Marathi (6 March 2024) | Latest Update on Manoj Jarange Patil, Loksabha Election, Amit Shah, Maha Yuti, MVA and Overall Maharashtra
Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक धक्का? तीन वेळा आमदार राहिलेला बडा नेता अमित शाहांच्या भेटीला, भाजपमध्ये प्रवेश करणार?

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सांगोला तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सांगोला तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. सांगोला तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या महुद ग्रामपंचायतीच्या सरपंच संजिवनी लुंबाळ यांच्यासह शेकापच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. या भागात शिवसेनेची ताकद वाढली आहे.‌

Pune Metro: पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी मार्गाचं उद्घाटन येत्या 6 मार्चला उद्घाटन होण्याची शक्यता

पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी मार्गाच्या उद्घाटन येत्या 6 मार्चला उद्घाटन होण्याची शक्यता आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे या मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे उद्घाटन आज होणारे. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन २ वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पुण्यात येऊन केलं होतं. वनाझ ते रुबी हॉल असा 9.7 किमीचा मार्ग सुरु झाला होता. आज याच मार्गाचा पुढील टप्पा रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित 5.5 किमीच्या मेट्रो मार्गाचे उद्घाटन होतंय. या निमित्त रुबी हॉल मेट्रो स्थानकावर फुलांची भव्य सजावट करण्यात आली आहे.

Today Live Batmya in Marathi (6 March 2024) | Latest Update on Manoj Jarange Patil, Loksabha Election, Amit Shah, Maha Yuti, MVA and Overall Maharashtra
Farmer Protest: शेतकऱ्यांचं वादळ पुन्हा दिल्लीवर धडकणार, मोर्चामुळे प्रशासन अलर्टवर; ठिकठिकाणी पोलिसांचा फौजफाटा

नाशिक -- ७ मार्चपासून नाशिक शहरात मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर होणार कारवाई

नाशिक -- ७ मार्चपासून नाशिक शहरात मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर होणार कारवाई

नाशिक महापालिका प्रशासनाकडून थेट रस्त्यावर उतरून करण्यात येणार कारवाई

दुकानांवर मराठी पाट्या नसल्यास होणार दंडात्मक कारवाई

मागील काही दिवसांत पालिका प्रशासनाकडून शहरातील ६५ हजार दुकानांना मराठी पाट्या लावण्याची बजावण्यात आली होती नोटीस

मनसेचा वर्धापन दिन तसच राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धसका घेत पालिकेने कारवाईचा बडगा उगारल्याची चर्चा

मुंबई : महिन्याभरापासून बेपत्ता असलेल्या १२ वर्षीय मुलाचा मृतदेह सापडल्याने वडाळा परिसरात खळबळ

मुंबई : महिन्याभरापासून बेपत्ता असलेल्या १२ वर्षीय मुलाचा मृतदेह सापडल्याने वडाळा परिसरात खळबळ

वडाळ्याच्या शांतीनगर भागात सापडला संदीप उर्फ राज यादव याचा मृतदेह

२८ जानेवारी पासून होता बेपत्ता

डोकं धडापासून वेगळं करण्यात आल्याच समोर येताच वडाळा टी टी पोलिसांनी नोंदवला गुन्हा

अज्ञात इसमाविरोधात हत्या आणि अपहरणाचा गुन्हा नोंद

नाशिकहून अयोध्येला प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा अयोध्या प्रवास होणार सुखकर

नाशिककरांसाठी आनंदाची बातमी

नाशिकहून अयोध्येला प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा अयोध्या प्रवास होणार सुखकर

३१ मार्चपासून नाशिकहून नाशिक-लखनौ विमानसेवा सुरू होणार

३१ मार्चपासून नाशिक-नागपूर विमानसेवा थेट लखनौपर्यंत

भाविकांना अवघ्या ५ ते ६ तासांत नाशिकहून अयोध्येला पोहचता येणार

सध्या रेल्वेने अयोध्येला जाण्यासाठी करावा लागतो २४ ते ३० तासांचा प्रवास

थेट विमानसेवेमुळे भाविकांच्या प्रवासाच्या वेळेत होणार बचत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com