सांगली : नागपंचमीच्या (Nag Panchami 2022) पूर्वसंध्येस अवैधरीत्या तीन नाग पकडून ताब्यात ठेवल्याप्रकरणी वनविभागाने (forest department) दोन तरुणांना (youth) ताब्यात घेतलंय. वाळवा (walva) तालुक्यातील कुरळप येथील हे तरुण आहेत. (Nag Panchami Latest Marathi News)
वनविभागानं दिलेल्या माहितीनूसार वाळवा तालुक्यातील कुरळप येथील विशाल अशोक पवार (वय २९) व हर्षद प्रकाश वडार यांनी बेकायदेशिर रित्या त्यांच्याकडे नाग ठेवले हाेते. या दाेघांकडून तीन नाग जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्या विरोधात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (Sangli Crime News)
संशयित विशाल पवार व संशयित हर्षद वडार या दोन तरुणांनी कुरळप येथील परीट मळा मधील शुभम परीट यांचे शेतातील वापरात नसलेल्या घरामध्ये हे नाग लपवून ठेवले होते. सांगली उपवनसंरक्षक नीता कट्टे, सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे यांना त्याची माहिती मिळाली. (Shirala Nag Panchami News)
त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील वनपरिक्षेत्र अधिकारी शिराळा सचिन जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती पल्लवी चव्हाण, वनपाल सुरेश चरापले वनरक्षक अमोल साठे प्रकाश पाटील, श्रीमती रायना पाटोळे, सुनील पवार व सर्पमित्र अमित कुंभार यांनी धाड टाकून तिन्ही नाग ताब्यात घेतले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.