बीड : बीडच्या (beed) माजलगाव (majalgaon) तालुक्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या २४ तासांत तीन जणांच्या आत्महत्याने या भागात एकच खळबळ उडाली आहे. या तिन्ही घटना वेगवेगळ्या कारणांनी असल्या तरी आत्महत्या करणारे उमदे वय असल्याने परिसरात चिंता पसरली हाेती. (beed latest marathi news)
माजलगाव (majalgaon) शहरालगत असणाऱ्या केसापुरी कॅम्प येथे सुरेश रामकिसन बडे येथील शिक्षकाने (teacher) नैराश्यातून आज पहाटे तीन वाजता घरातील लोखंडी आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
दुसरी घटना राजेवाडी (rajewadi) येथे कृष्णा बालासाहेब कोके (वय १९) या युवकाने (youth) अज्ञात कारणावरून रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कमरेला असलेल्या बेल्टच्या सहाय्याने राहत्या घरी गळफास घेतल्याचे दिंद्रुड पोलिसांनी (police) सांगितलं.
तिसरी घटना राजेगाव (rajegoan) येथील रामचंद्र धुराजी गरड (वय ४०) यांनी व्यवहारातील आर्थिक जाचास कंटाळून शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण ठाण्यात अकस्मात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत आत्महत्येच्या तीन घटना घडल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.