VIDEO : खळबळजनक! भाजप आमदाराला भररस्त्यात पिस्तूलने गोळ्या घालण्याची धमकी; VIDEO व्हायरल

Political News : मंगेश चव्हाण यांना चॅलेंज आहे त्यांनी या मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावं. छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो मी त्यांना संपवून टाकेल, अशी धडधडीत धमकी जोर्वेकर यांनी दिली आहे.
भाजप उमेदवाराच्या ताफ्यावर गोळीबार, बिहारमधील खळबळजनक घटना
Lok Sabha Election 2024Saam tv
Published On

संजय महाजन

चाळीसगाव भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांना भर रस्त्यावर पिस्तूलने गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या धमकीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर आता व्हायरल होताना दिसत आहे.

भाजप उमेदवाराच्या ताफ्यावर गोळीबार, बिहारमधील खळबळजनक घटना
Bjp Mla Firing | आमदार गायकवाड यांचा थेट पोलिस ठाण्यात गोळीबार, पोलिस स्टेशनबाहेर नेमकं काय घडलं?

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन सुरू असताना ज्येष्ठ नेते आणि माजी सरपंच किसनराव जोर्वेकर यांनी ही धमकी दिली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मंगेश चव्हाण यांना चॅलेंज आहे त्यांनी या मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावं. छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो मी त्यांना संपवून टाकेल, अशी धडधडीत धमकी जोर्वेकर यांनी दिली आहे.

व्हिडिओमध्ये जार्वेकर पुढे बोलत आहेत की, " माझं वय 73 वर्षे आहे. मला कॅन्सर आणि डायबिटीस आहे. माझ्या नादी लागशील तर रस्त्यावर पिस्तुल्याने गोळी घालून टाकेल." भर सभेत उपस्थितांना संबोधीत करताना जार्वेकरांनी अशी धमकी दिली आहे.

धमकीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून जार्वेकर यांनी हे वक्तव्य केलं तेव्हा त्यावेळी तेथे माजी खासदार उन्मेष पाटील आणि माजी आमदार राजीव देशमुख हे देखील उपस्थित होते. शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी दुष्काळी अनुदानासाठी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनावरून उन्मेष पाटील आणि मंगेश चव्हाण यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

सरकारी पेन्शन घेणाऱ्या आणि हजारो रुपयांचे दुष्काळी अनुदान मिळवणाऱ्या पाटील यांचे हे आंदोलन स्वतःसाठी आहे. गरीब शेतकऱ्यांविषयी त्यांना काहीही कळवळा नाही अशा शब्दांत उन्मेष पाटील यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यावरून किसनराव जोर्वेकर यांनी ही धमकी दिल्याचं म्हटलं जातंय.

भाजप उमेदवाराच्या ताफ्यावर गोळीबार, बिहारमधील खळबळजनक घटना
BJP MLA Ganpat Gaikwad Firing : गणपत गायकवाड यांना कोर्टात हजर केलं जाणार? परिस्थिती नेमकी कशी?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com