Shah Rukh Khan : शाहरूखच्या जीवावर कोण उठलं? सलमाननंतर किंग खानला धमकी

Death threat issued to Shah Rukh Khan : अभिनेता सलमान खान याच्यानंतर आता शाहरुख खान यालाही जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
Shah Rukh Khan Threat Call
shah rukh khanSaam Tv
Published On

Death threat to Shah Rukh Khan : अभिनेता सलमान खाननंतर आता शाहरुख खान जीवे मारण्याची धमकी आली आहे. शाहरुखला धमकी मिळाल्यानंतर मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचं एक पथक मध्य प्रदेशमधील रायपूरला गेलं आहे.

रायपूरमधून चोरीच्या मोबाईलवरुन धमकी

बॉलिवुडशी कनेक्शन असलेले माजी मंत्री आणि सलमान खानचे मित्र बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर दहशत निर्माण झाली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने हत्येची जबाबदारी घेत सलमानलाही धमकी दिली आहे. हे प्रकरण ताजं असतानाच किंग खान शाहरुख खानलाही धमकी आली आहे. त्यामुळे बॉलिवुडमध्ये खळबळ उडाली आहे. वांद्रे पोलिसांना 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता पोलिस ठाण्यात फोन आला. फोन करणारा व्यक्ती म्हणाला...

शाहरुख खान मन्नत बँड स्टँडवाला आहे. त्याने मला 50 लाख रुपये दिले नाही तर त्याला जीवे मारेन. यावर पोलिसांनी कॉल करणाऱ्याला त्याचं नाव विचारलं असता, त्याने माझं नाव काय आहे हे महत्त्वाचं नाही. लिहायचं असेल, तर माझं नाव 'हिंदुस्थानी' लिहा, असं तो म्हणाला होता.

Shah Rukh Khan Threat Call
Raj Thackeray vs Uddhav Thackeray : हिंदुत्वावरून ठाकरेंमध्ये दिवार, महायुतीसाठी जमीन सुपीक होणार?
Shah Rukh Khan Threat Call
Maharashtra Election : सगळ्या योजना ढापल्या, दिल्लीतला फुसका फटाका येऊन गेला, शिंदेंची राहुल गांधींवर खरमरीत टीका

पोलिसांनी या धमकीची गंभीर दखल घेतली.

धमकीचा कॉल रायपूर वरून करण्यात आल्याचं उघड झालं. त्यानंतर मुंबई पोलिसांचे पथक रायपूर मध्ये दाखल झालं. तपासात फैजान खान नावाच्या व्यक्तीने हा फोन केल्याचं समोर आलं होतं. पेशाने वकील असलेल्या फैजान खान यांचा मोबाईल 2 नोव्हेंबर रोजी चोरी झाला आहे. मोबाईल चोरीची तक्रारही त्यांनी दाखल केली आहे. आता पोलिसांकडून या मोबाईल चोराचा शोध सुरू आहे.

बॉलिवूड दबंग खान सलमानला वारंवार धमक्या येत असताना आता, शाहरुख खानला खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीनंतर इंडस्ट्रीसह किंग खानच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे.

Shah Rukh Khan Threat Call
Maharashtra Weather : उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली, शेकोट्या पेटू लागल्या, वाचा राज्याचा हवामानाचा अंदाज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com