CCTV पासून बचाव करण्यासाठी चोरट्यांची नवी आयडीया; PPE किट घालून दुकानात चोरी

चोरटे CCTV मुळे सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ते आता अशा नवनवीन स्वरूपाच्या आयडीया शोधून काढत आहेत.
CCTV पासून बचाव करण्यासाठी चोरट्यांची नवी आयडीया; PPE किट घालून दुकानात चोरी
CCTV पासून बचाव करण्यासाठी चोरट्यांची नवी आयडीया; PPE किट घालून दुकानात चोरीअरुण जोशी
Published On

अमरावती : मेळघाटच्या धारणी तालुक्यामध्ये एका चोरट्याने चक्क पीपीई किट (PPE Kit) घालून दारूच्या दुकानात चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कलमखार येथील देशीदारूच्या दुकानात हा चोरटा रात्रीचा शिरला. त्याने CCTV चे डिव्हिआर, एलसीडी व रोख रक्कम पळवली आहे. दुकानात चोरी करणार चोर CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असला तरी पीपीई कीटमुळे त्यांचा चेहरा ओळखत नाहीये.

CCTV पासून बचाव करण्यासाठी चोरट्यांची नवी आयडीया; PPE किट घालून दुकानात चोरी
Amrita Fadnavis : महाविकास आघाडी नव्हे; "महा-गोंधळलेलं" सरकार - अमृता फडणवीस

दरम्यान चोरट्याने स्वतःची ओळख लपविण्यासाठी चोरट्यांनी आता नवी शक्कल लढविल्याचे दिसून येत आहे. चोरटे CCTV मुळे सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ते आता अशा नवनवीन स्वरूपाच्या आयडीया शोधून काढत आहेत हेच या घटनेवरून स्पष्ट होत आहे.

या चोरीची तक्रार पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी चोरट्यावरती गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. चोरट्याने या दुकानातून 40 हजार रुपयांसह, सुमारे 30 हजार रुपयांचा LCD व DVR असा जवळपास एक लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com