बुलडाणा: रस्त्यावर स्कूटी उभी करून जिलेबी खाण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या स्कुटीची डिक्की फोडून भामट्याने ७५ हजार रुपये लंपास केल्याची घटना चिखली शहरातील वर्दळीच्या डीपी रोडवर घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मद्धे कैद झाली आहे. चिखली तालुक्यातील आन्वी या गावातील शेतकरी वासुदेव दौलतराव पवार हें महाराष्ट्र बँकेचे कर्ज भरण्यासाठी चिखलीत आले होते. स्टेट बँकेतून ५० हजार व चिखली अर्बन बँकेतून काढलेले २५ हजार असे ७५ हजार रुपये त्यांनी स्कुटीच्या डिक्कीत ठेवले. त्यानंतर चिखली येथील लक्ष्मी मार्केट येथे हरियाणा जलेबी सेंटरवर जिलेबी खाण्यासाठी ते गेले.
स्कुटी लक्ष्मी मार्केट येथील नागवाणी चार्टेड अकाउंटंट यांच्या कार्यालयासमोर उभी केली. थोड्या वेळात ते जिलेबी खाऊन परत आले व स्कुटी घेऊन कर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र बँकेत गेले असता त्यांनी डिक्की उघडून बघितली असता डिक्कीत त्यांना पैसे दिसले नाहीत. चोरट्याने डिक्कीचे लॉक तोडून ७५ हजार रुपये लंपास केल्याची तक्रार पवार यांनी चिखली पोलिसात दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी जिथे घटना घडली त्या भागातील सीसीटीव्ही तपासले असता चोरटे डिक्की तुन पैसे लंपास करताना दिसून आले आता चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केले असून फरार चोरट्याचा शोध पोलीस घेत आहेत.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.