आईच्या दोन्ही किडन्या निकामी; उपचारासाठी मुलाची दानशूरांना आर्त हाक
बीड: आजपर्यंत अनेक मुलांनी आपल्या जन्मदात्या आईवडिलांना वृद्धाश्रमात सोडलेल्या बातम्या आपण पाहिल्या असतील. मात्र आज आम्ही आपल्याला दोन्ही किडन्या निकामी झालेल्या आईला जगण्यासाठी, मुलाची धडपड दाखवणार आहोत. बीडच्या माजलगाव तालुक्यात असणाऱ्या दिंद्रुड येथील, शिलाबाई कारभारी कोमटवार या 50 वर्षीय महिलेच्या, दोन्ही किडन्या निकामी झाल्या असून त्या जीवनाच्या अंतिम घटका मोजत आहेत. त्यांच्या जगण्यासाठी मुलांची धडपड चालू आहे. मात्र गरिबीचा डाग लागलेल्या कोमटवार कुटुंबाला आधार कोण देणार ? हाच प्रश्न निर्माण झाला आहे.
शिलाबाई कारभारी कोमटवार या मंगल कार्यक्रमात स्वयंपाक करण्याचं काम करतात. गेल्या सहा महिन्यांपूर्वी अंगावर आलेल्या सुजेचं कारण घेऊन दवाखान्यामध्ये दाखल झाल्यानंतर, त्यांना रिपोर्ट पाहून धक्का बसला. कारण त्यांचा दोन्ही किडण्या निकामी झाल्याचा अहवाल रुग्णालयातून मिळाला होता. काम केले तर पोट भरेल अशी परिस्थिती असलेल्या कोमटवार परिवारावर, या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र खचून न जाता शिलाबाई यांच्या, गणेश व रवी या दोन्ही मुलांनी त्यांच्यावर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार केले. मात्र फरक जाणवला नाही.
आतापर्यंत मुलांनी आई शीलाबाईंच्या आजारावर आठ ते दहा लाख रुपयांचा खर्च केला आहे. आपल्या आईला जगवण्यासाठी गणेश व रवीने विविध बँकांचे लाखोंचे कर्ज उचलले आहे मात्र त्याचा म्हणावं तेवढा फायदा झाला नाही. आता कोमटवार परिवाराला जगण्याची ही भ्रांत आहे. त्यातच क्रियेटीन वाढत असल्याने एक दिवसाआड शिलाबाई यांचा जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन डायलिसिस करावा लागतोय. मात्र सद्यस्थितीत केवळ पैसे नसल्याने आठवड्यातून एक वेळ त्यांना डायलिसिस मिळत आहे.
कोमटवार कुटुंबाला महात्मा ज्योतिबा फुले व आयुष्यमान भारत योजनेने मोठा आधार दिलाय. मात्र आज घडीला शिलाबाईवर उपचार करण्यासाठी मुलांना पैशाची अतिशय गरज आहे. यामुळं समाजातील दानशूरांसह सामाजिक संस्थांना पुढे येऊन मदत करावी. असे आवाहन कोमटवार कुटुंबाने केलंय.
मदतीसाठी बँक डिटेल्स
गणेश कारभारी कोमटवार
AC - 80049069540
IFSC CODE - MAHG0004512
GOOGLE PAY & PHON PAY - 9119411848
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.