
मंगेश भांडेकर
Devendra Fadnavis News: गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम नक्षलग्रस्त भागात जिवाची बाजी लावून काम करणाऱ्या सी-60 च्या पोलीस जवानांना यापुढे दीड पट वेतनाचा जी .आर. हे सरकार कायम ठेवणार आहे. तसेच दरवर्षी जी .आर.काढण्याची जिकिरीची प्रक्रिया बंद करणार आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. (latest Marathi News)
गडचिरोलीतील प्राणहिता अहेरी येथील पोलीस उपमुख्यालयात आयोजित कार्यक्रमात पोलीस जवानांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस बोलत होते. 'गडचिरोली जिल्ह्यातील पोलिस नक्षल्यांशी शौर्याने लढत असून, नक्षलवाद बऱ्याच अंशी कमी झाला आहे. यामुळेच राष्ट्रपतींचे पोलीस शौर्यपदक गडचिरोली पोलिसांना मिळाले आहेत. सरकार पोलिसांच्या पाठीशी असून, त्यांना काहीही कमी पडू देणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पी.एम.जी पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदाराचा सत्कार गृहमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. यावेळी अहेरी येथील पोलीस संकुलात पोलीस कँटीन,बाल उद्यान,वाचनालयाचे उद्घाटन गृहमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनीना सायकल वाटप करण्यात आले. पाच एअरटेल मोबाइलच्या टॉवरचे लोकार्पण करण्यात आले. या टावरच्या कनेक्टिव्हिटीमुळे शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या संधी दुर्गम भागात पोहोचण्यास मदत होईल.
गडचिरोली जिल्ह्यात विविध कंपन्यांचे एकूण 450 टॉवर उभारण्यात येणार आहे. सध्यास्थितीत यातील 40 टॉवर पूर्ण झाले आहे. उर्वरित टॉवर लवकरात लवकर उभे करण्यासाठी संबंधित मोबाईल कंपन्यांना निर्देश देण्यात येतील. कनेक्टिव्हिटीमुळे गडचिरोलीच्या विकासाची गती वाढेल असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन पद्धतीने स्थानिक नागरिकांची संवाद साधला तसेच प्राणहिता मुख्यालयात असलेल्या शहीद स्मारकाला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.