Sangli Crime News : मिरजेत तीन बंगल्यांत घरफोडी

रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
sangli, miraj
sangli, mirajsaam tv
Published On

Sangli Crime News : मिरजेत तीन बंगल्यांची घरफोडी करण्यात आली आहे तर चार चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांनी पळ काढला. मात्र दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न करण्यात आला. एका बंगल्यातून किरकोळ रक्कम आणि चांदीचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. (Maharashtra News)

sangli, miraj
Nitesh Rane News : 'त्या' शब्द प्रयाेगावरुन आमदार नितेश राणेंवर गुन्हा दाखल हाेणार ? पाेलिस, कायदेतज्ञांनी दिली 'ही' माहिती

बंगल्याला कुलूप घालून कुटुंब परगावी गेलेचा फायदा घेऊन विस्तारित भागातील मिरज बोलवाड रस्त्यावर स्वामी समर्थ पार्क आणि सिद्धिविनायक पार्क येथील तीन बंगले फोडल्याचे घटना घडली आहे.

sangli, miraj
Pimpri Chinchwad Crime News : मैत्रिणीच्या मदतीने पार्टनरचा काटा काढण्यासाठी 50 लाखाची दिली सुपारी; CA सह महिला, कुख्यात गुंड अटकेत

प्रशांत कांबळे ,राजेंद्र सातपुते (स्वामी समर्थ पार्क बोलवाड रोड) विक्रम अकिवाटे (सिद्धिविनायक पार्क, बोलवाड रोड) चौगुले मळा यांचा बंगला चोरट्यांनी मध्यरात्री फोडला. शेजारच्या काही लोकांना चोरीचा संशय आल्याने परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन आरडाओरडा केल्यानंतर चोरट्यांनी पळ काढला.

sangli, miraj
Solapur Crime News : हनुमान मंदिरात गांजा ओढण्यास विरोध, महंतावर हल्ला; सोलापूरातील साधू, महंत आक्रमक

दोन ठिकाणीं चोरीचा प्रयत्न तर राजेंद्र सातपुते यांच्या घरातील किरकोळ रक्कम आणि चांदीची मूर्ती चोरुन नेण्यात चोरट्यांना यश आले. दरम्यान पोलिसांना (police) माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

या परिसरात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता चार चोरटे फिरताना सीसीटीव्हीत दिसून आले. याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही तक्रार दाखल झाली नाही. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com