Pimpri Chinchwad Crime News : मैत्रिणीच्या मदतीने पार्टनरचा काटा काढण्यासाठी 50 लाखाची दिली सुपारी; CA सह महिला, कुख्यात गुंड अटकेत

पाेलिस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
pimpri chinchwad
pimpri chinchwadsaam tv

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त हद्दीतील एका सी ए अर्थात चार्टर्ड अकाउंटंटने आपल्या व्यावसायिक भागीदार मित्राच खून करण्यासाठी 50 लाख रुपयांची सुपारी दिल्याचं धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Maharashtra News)

pimpri chinchwad
Saam Impact : चिमुकल्या गणेश माळीच्या संघर्षाची कहाणी पाहून डाेळे पाणावले, जिद्दीला मुख्यमंत्र्यांकडून सलाम

आपल्या व्यावसायिक भागीदार मित्राचा खून करण्यासाठी सीएने एका रेकॉर्डवरील कुख्यात गुंडास आपल्या जवळच्या मैत्रिणीच्या सहाय्याने 50 लाख रुपयाची सुपारी दिल्याचं धक्कादायक प्रकार उघडकीस आहे. या प्रकरणात दरोडा विरोधी पोलीस पथकाने सीए विवेक नंदकिशोर लाहोटी (CA Vivek Nandkishore Lahoti) आणि रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार सुधीर अनिल परदेशी (Sudhir Pardeshi) आणि एका महिलेस अटक केली आहे.

pimpri chinchwad
PSI Success Story: शेतमजुर मुलगा पीएसआय हाेताच आई-वडिलांना आनंदाश्रू अनावर...

या दोन्ही आरोपींच्या ताब्यातून 3 देशी पिस्टल आणि 24 जिवंत काडतुसे असा मुदेमाल दरोडा विरोधी पोलीस पथकाने जप्त केला आहे. सीए विवेक नंदकिशोर लाहोटी याचा व्यावसायिक भागीदार राजू माळी याचं खून करण्यासाठी विवेक नंदकिशोर लाहोटी याने आपल्या जवळच्या एका मैत्रिणीच्या मदतीने रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार सुधीर अनिल परदेशी आणि शरद साळवी याला 50 लाख रुपयाची सुपारी दिल्याचं पोलीस तपासात उघडकीस आला आहे.

pimpri chinchwad
Vasantrao Kale Sugar Factory News : वसंतराव काळे साखर कारखाना अध्यक्षपदचा कार्यभार घेताच कल्याणराव काळे म्हणाले...

सीए विवेक नंदकिशोर लाहोटी यांचा राजू माळी यांच्यासोबत जमीन खरेदी -विक्रीचा व्यवसाय आहे. या व्यवसायातून उद्भवलेल्या वादातून सीए विवेक नंदकिशोर लाहोटी यांने राजू माळी यांचा सुपारी देऊन खून करण्याचा कट रचला होता असं पोलीस (police) तपासात उघडकीस आल आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com