Aurangabad : पुण्यानंतर आता औरंगाबादेत कोयता गँगची दहशत; चिकलठाणा पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न (पाहा व्हिडीओ)

या घटनेचा कसून तपास झाला पाहिजे अशी मागणी हाेत आहे.
Crime News, Aurangabad
Crime News, AurangabadSaamTv
Published On

Aurangabad News : औरंगाबाद (Aurangabad) येथील सुंदरवाडी शिवारातील काही वसाहतींमध्ये कोयता गँगने गुरुवारी हैदौस घातला. घरात घुसून काही कुटुंबियांच्या मानेवर कोयता ठेवून लुटमार करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्याच्या घरातून दुचाकी चोरून नेली. तसेच सिरसाटवाडी भागातील नागरिकांच्या (citizens) घराच्या बाहेरून कड्या लावण्यात आल्या होत्या. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असली तरी पोलिसांनी अद्याप कोणतीच कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Crime News, Aurangabad
Nashik Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर निवडणुकीत संधीचं सोनं करणार : सुजय विखे- पाटील

औरंगाबाद शहराच्या जवळचा भाग असलेल्या सुंदरवाडी शिवारात छोट्या वसाहती तयार झालेल्या आहेत. या वसाहतींपैकी कृष्णनगर आणि सिरसाटवाडी या भागात हातात कोयते घेऊन गुरूवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास चोरटे आले होते. चोरट्यांनी कृष्णनगर येथील एका घरात घुसताना लोखंडी गेट, त्यानंतर घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.

घरातील सदस्यांच्या मानेवर कोयते ठेवून त्याचे काही दागिने आणि महत्वाचे कागदपत्रही घेऊन गेले. तसेच तेथून पुढे ते ग्रामपंचायत सदस्य माजिद शेख यांच्या घरी गेले. त्यांच्या कंपाऊंडमधील दुचाकी (two wheeler) चोरून नेली व कृष्णनगरमधील एका जणाचे घेतलेले सर्व कागदपत्रे माजिद शेख यांच्या घरासमोर टाकून पसार झाले.

Crime News, Aurangabad
Jalna : रेल्वे खाली जाणार ताेच...जीवाची बाजी लावत जवानाने वाचविले प्रवाशाला; पाहा थरारक व्हिडिओ

कृष्णनगर परिसरातील लोक आरडाओरड करतील आणि समोरच्या बाजूला असलेल्या सिरसाटवाडीतील लोक मदतील येतील म्हणून या कोयता गँगच्या चोरट्यांनी सिरसाटवाडीच्या घराच्या दरवाजाच्या बाहेरून कड्या लावून घेतल्या होत्या. या घटनेनंतर माजिद शेख यांनी सीसीटीव्ही फुटेज (cctv footage) काढून चिकलठाणा पोलिसांना (police) दिले आहे. याप्रकरणी चिकलठाणा पोलिसांनी अद्याप कोणतीच कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com