वाशिम : वाशिम Washim शहरातील चामुंडा देवी परिसरात खाजगी लाईनमन कैलास सरकटे हा विजेचे काम करण्याकरिता वीजेच्या खांबावर On Electric Pole चढला होता काम करत असतानाच त्याला विजेचा शॉक Shock लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचाराकरिता खाजगी रुग्णालयात Private Hospital दाखल करण्यात आले असून, प्रकृती चिंताजनक असल्याचं समजत आहे. (The youth was seriously injured due to shock)
हे देखील पहा -
शासकीय लाईनमनच्या हलगर्जी पणा मुळे खाजगी युवकाला विजेचे काम करण्याकरिता खांबावर पाठवल्याने युवकाचा जीव धोक्यात घालणाऱ्या या घटनेला जबाबदार असलेल्या महावितरणने संबंधित कर्मच्यावर कारवाई करून,जखमी युवकांना आर्थिक मदत करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
स्थानिक चामुंडा देवी परिसरात काल एका वीज ग्राहकाने खाजगी इसम कैलास सरकटे यांना बोलावले आणि विजेचा खांबावर काम करीत असताना. त्यांना विजेचा धक्का लागून गंभीर जखमी झाला आहे. या खाजगी इसमाला ग्राहकाने बोलाविले का,आमच्या कर्मचाऱ्यांना बोलावून खांबावर चढण्यासाठी सांगितले याची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाणार असल्याच वीज वितरण चे अधीक्षक अभियंता तायडे यांनी सांगितले.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.