फक्त वोटबँकेसाठी केला गावाचा वापर; सोयीसुविधा मात्र गावापासून दुरवर!

नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा अतिदुर्गम भागातील अनेक गावं आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. याव्यतिरिक्त सपाटी भागातील नवापूर तालुक्याच्या टोकावररील वांझळे गाव देखील सोयीसुविधांपासून वंचित आहे.
फक्त वोटबँकेसाठी केला गावाचा वापर; सोयीसुविधा मात्र गावापासून दुरवर!
दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा अतिदुर्गम भागातील अनेक गावं आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. याव्यतिरिक्त सपाटी भागातील नवापूर तालुक्याच्या टोकावर असलेल्या वांझळे गाव देखील सोयीसुविधांपासून वंचित आहे. हे गाव आजपर्यंत विविध राजकीय पक्षांचे फक्त वोट बँक म्हणून नावा रूपाला आहे.The village is used only as a vote bank by various political parties

महाराष्ट्र राज्याच्या शेवटचा जिल्हा, अतिदुर्गम जिल्हा, आदिवासी बहुल जिल्हा अशी ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात आजही दुर्गम भागासह सपाटी भागातील अनेक गाव सोयीसुविधांपासून वंचित आहे. त्यापैकीच नवापुर तालुक्याच्या टोकावरील वांझळे गाव देखील सोयीसुविधांपासून कोसो दूर आहे. 980 लोकसंख्या असलेल्या वांजळे गावात जाण्यासाठी रस्ते नावाला आहे. खोलघर ग्रुप ग्रामपंचायत मध्ये येत असलेल्या वांजळे गावातील नागरिकांना खोलघर गावापर्यंत तीन किलोमीटरचा चिखलमय रस्त्याचा प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात नदीच्या फरशी पुलावरून पाणी जात असल्यामुळे गावांचा संपर्क तुटतो. गरोदर मातांना दवाखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चिखलमय रस्त्यातून झोळी करून न्यावे लागते. अशी परिस्थीती आजही या गावामध्ये आहे.

फक्त वोटबँकेसाठी केला गावाचा वापर; सोयीसुविधा मात्र गावापासून दुरवर!
"...तर कोल्हापूरच काय; मी मुंबईतून निवडणूक जिंकून दाखवेन!"

980 लोकसंख्या असलेल्या वांजळे गावाच्या शेजारी पाझर तलाव असून सुद्धा गावात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. गावातील स्त्रियांना एक किलोमीटर लांब असलेल्या धरणातून पाणी आणण्याची कसरत करावी लागते. तर स्वस्त धान्य दुकान तीन किलोमीटर लांब असलेल्या खोलघर गावात असल्याने धान्य घेण्यासाठी रस्त्या भावी चिखलातून पायी जावे लागते. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवरील डोंगरदऱ्यात असलेल्या या वांजळे गावात विविध राजकीय पक्षांनी आजपर्यंत गावातील नागरिकांना केवळ वोट बँक म्हणून वापर केला असून गावातील योजना फक्त कागदावरच दिसत असल्याचे विदारक दृश्य पाहायला मिळतं आहे दरम्यान आतातरी लोकप्रतिनिधींनी गावाकडे फक्त इलेक्शनपुरत लक्ष न देता इतरवेळी पण द्यावं आणि गावाचा विकास करावा अशी गावकऱ्यांची इच्छा आहे.

Edited By-Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com