चंद्रपूर - जिल्ह्यातील ब्रम्हपुरी (Bhramapuri) तालुक्यातल्या उचली गावात गेल्या 1 वर्षापासून अजगराची दहशत निर्माण झाली होती. अखेर या अजगराला (Sanke) पकडण्यात यश आले आहे. या अजराने तब्बल 9 बकऱ्या फस्त केल्याची माहिती गावकऱ्यांकडून देण्यात आली आहे. ग्रामस्थांना गावालगत शेतशिवरात एक महाकाय अजगर सतत दिसायचा. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून अजगरामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण होते. (Chandrapur Latest News)
या अजगराने एक-एक करत गावातील तब्बल 9 बकऱ्या फस्त केल्या आहेत. अजगराचा वावर असल्याने गावकरी शेतात जायला घाबरायचे, तसेच लहान मुलांना लगतच्या भागात जाण्यास प्रतिबंध करण्यात आले होते. दरम्यान शेतकरी ढोंगे यांची चौथी बकरी अजगराने मारली. ही माहिती अर्थ कंजरवेशन ऑर्गायझेशन संस्था सदस्यांना देण्यात आली.
सर्पतज्ञ ललित उरकुडे, विवेक राखडे, चेतन राखडे व ईशान वठे यांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यांनी मोठ्या शिताफीने अजगराला पकडले. महाकाय अजगर जेरबंद झालेला बघून गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला व संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. हा अजगर एकूण १२ फूट लांबीचा होता. या आकाराचा अजगर ब्रम्हपुरी भागात आढळल्याची ही पहिलीच नोंद आहे. या अजगरला जंगलात सुरक्षित सोडण्यात आले.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.