SC : बैलगाडा शर्यत सुरु होणार? बंदी हटविण्यासाठी राज्य शासनाची सुप्रिम कार्टोत धाव (पहा Video)
SC : बैलगाडा शर्यत सुरु होणार? बंदी हटविण्यासाठी राज्य शासनाची सुप्रिम कार्टोत धाव (पहा Video)SaamTV

SC : बैलगाडा शर्यत सुरु होणार? बंदी हटविण्यासाठी राज्य शासनाची सुप्रिम कार्टोत धाव (पहा Video)

राज्यात बैलगाडा शर्यतीची प्राचीन परंपरा आहेच मात्र तो शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा आणि अतिशय आवडीचा छंद म्हणून या शर्यतींकडे पाहिलं जातं.

संतोष शाळीग्राम -

दिल्ली : राज्यात बैलगाडा शर्यतीची (Bullock cart race) प्राचीन परंपरा आहेच मात्र तो शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा आणि अतिशय आवडीचा छंद म्हणून या शर्यतींकडे पाहिलं जातं मात्र हायकोर्टाने या शर्यतींवरती बंदी घातल्यापासून शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे आणि त्यामुळेच बैलगाडा मालक सतत राज्य सरकारवर या शर्यती सुरु करण्यासाठी विनंती आणि दबाव आणत असतात त्यामुळेच आता राज्यातील आघाडी सरकार शर्यतींबाबत सकारात्मक असल्याचं दिसतं आहे. (The state government is again in the Supreme Court in the bullock cart race case)

पहा व्हिडीओ -

राज्यातील बैलगाडा शर्यंतींवररील बंदी हटवण्याबाबत महाराष्ट्र सरकारने (Maharashtra goverment) सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्ट तयार झाले असून येत्या सोमवारी यावरती सुनावनी होणार आहे.

SC : बैलगाडा शर्यत सुरु होणार? बंदी हटविण्यासाठी राज्य शासनाची सुप्रिम कार्टोत धाव (पहा Video)
विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी BJPकडून संजय केनेकर यांची उमेदवारी निश्चित

दरम्यान राज्यात खिल्लार जातीचे बैल नामशेष होण्याच्या मार्गावर असून या जातीचे संवर्धन होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ही जात फक्त शर्यतीसाठीच नाही तर दुध उत्पादन आणि पैदास वाढविण्यासाठीही महत्त्वाची असून त्यासोबतच बैलांना सराव महत्त्वाचा आहे. शर्यती आणि आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे यासाठी हा सराव सुरु करण्यासाठी दिलासादायक मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असून राज्यातील बैलगाडी स्पर्धा सुरु करण्यासाठी सर्व विधानसभा सदस्य सकारात्मक आहेत असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील मागील काही दिवसांमध्ये म्हणाले होते. त्यामुळे आता सरकार या शर्यतींसाठी सकारात्मक असून कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहील.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com