चंद्रकांत पाटलांनी अमित शहांना लिहिलेले पत्र म्हणजे राजकीय स्टंट

सरकार पाडण्यासाठी त्यांचा हा सर्व खटाटोप आहे.
चंद्रकांत पाटलांनी अमित शहांना लिहिलेले पत्र म्हणजे राजकीय स्टंट
चंद्रकांत पाटलांनी अमित शहांना लिहिलेले पत्र म्हणजे राजकीय स्टंट Saam tv

सचिन अगरवाल

अहमदनगर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांना लिहिलेले पत्र हा राजकीय स्टंट आहे. केंद्र सरकारला (Central Government) पत्र लिहायचं होतं तर मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत (Maratha and OBC reservation) लिहायला हवं होतं. अशी खरमरीत टिका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी केली आहे. राज्यातील 30 साखर कारखान्यांवर कारवाई करण्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी अमित शहा यांना पाठवलेले पत्र राजकिय हेतूने पाठवले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कर्जत तालुक्यातील थेरवडी येथील रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनासाठी रोहित पवार आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (The letter written by Chandrakant Patil to Amit Shah is a political stunt)

हे देखील पहा -

राजकीय हेतूने प्रेरित चंद्रकांतदादांचे हे पत्रं आहे. सरकार पाडण्यासाठी त्यांचा हा सर्व खटाटोप आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्रातून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा विषय मांडायला हवा होता. कोरोना महामारीमुळे राज्य सरकारला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. केंद्रसरकारने 'जीएसटी' तब्बल ३० हजार कोटीपेक्षा अधिक थकबाकी राज्याला दिलेली नाही. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीमध्ये गुजरातला भरीव मदत केली, मात्र महाराष्ट्रबाबत दुजाभाव करत केंद्र सरकारने मदत दिलेली नाही.

चंद्रकांत पाटलांनी अमित शहांना लिहिलेले पत्र म्हणजे राजकीय स्टंट
RTO परिक्षेचा घोळ: सरकार आणखी किती स्वप्निल तयार करणार?

अशात फडणवीस राज्य सरकार समोरील अडचणी वावण्याचं काम करून जनतेला सरकार अडचणीत असल्याचा आभास निर्माण करून आणि आम्ही सक्षम पर्याय असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हे चुकीचं असल्याचं देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्यांनी पाठवलेलं पत्रं राजकीय हेतूने लिहिलं असल्याचं दिसत आहे. त्यामुळे जी चौकशी व्हायची होऊदे, पण ती चौकशी पारदर्शक झाली पाहिजे. त्यापुर्वी कारखान्यांची पार्श्वभूमीदेखील जाणून घ्यायला हवी. असेही यावेळी रोहित पवारांनी म्हटले आहे.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com