रायगडात पहिली ते चौथीच्या शाळेची घंटा वाजली, तब्बल दीड वर्षानंतर विद्यार्थ्यांचा किलबिलाट

कोरोनाच्या नियमांचे पालन करत शाळा सुरू करण्यात आले आहेत
रायगडात  पहिली ते चौथीच्या शाळेची घंटा वाजली, तब्बल दीड वर्षानंतर विद्यार्थ्यांचा किलबिलाट
रायगडात पहिली ते चौथीच्या शाळेची घंटा वाजली, तब्बल दीड वर्षानंतर विद्यार्थ्यांचा किलबिलाटराजेश भोस्तेकर
Published On

राजेश भोस्तेकर

रायगड : रायगड जिल्ह्यामध्ये आज पहिली ते चौथीच्या शाळेची घंटा वाजली आहे. दीड वर्षाने शाळेत विद्यार्थी आल्याने त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे या छोट्या विद्यार्थ्यांचा किलबिलाट वर्गात सुरू झाला आहे. दीड वर्षाने मुले शाळेत आल्याने शिक्षकांनी त्याचे स्वागत केले आहे. जिल्ह्यात पहिली ते चौथीच्या 2108 शाळा असून 1 लाख 82 हजार विद्यार्थी आहेत.

हे देखील पहा-

10 हजार 669 शिक्षक असून साडेतीन हजार शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले नाही. त्यामुळे काही शाळा सुरू झाले नाहीत. मात्र, ज्या शाळा सुरू कारण्यात आले आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती पाहायला मिळत आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जिल्ह्यात पाचवी ते बारावी आणि महाविद्यालय सुरू झाली आहे. मात्र, पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू होते.

रायगडात  पहिली ते चौथीच्या शाळेची घंटा वाजली, तब्बल दीड वर्षानंतर विद्यार्थ्यांचा किलबिलाट
WhatsAppवर येणार इन्स्टाग्रामसारखं नवं फीचर, पाहा काय होणार बदल

शासनाने या विद्यार्थ्यांना ही शाळा 1 डिसेंबर पासून कोरोना नियमांचे पालन करून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील 2108 शाळांपैकी काही शाळा आजपासून सुरू करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील साडे दहा हजार पैकी सात हजार शिक्षकांचे 2 डोस लसीचे पूर्ण झाले आहेत. तर उर्वरित साडेतीन हजार शिक्षकांचे 1 डोसही पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे काही भागातील शाळा सुरू झाले नाहीत.

मात्र, इतर भागातील शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी, शिक्षकही आनंदित आहेत. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे तापमान, ऑक्सिजन तपासणी करून मास्क लावूनच वर्गात प्रवेश दिला जात आहे. दीड वर्षाने पुन्हा शाळेत आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळत होता. पालकांनीही शाळा सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com