एटीएम फोडणारा आरोपी बनावट नोटाही छापत होता, पोलिसांनी साहित्य केले जप्त

एटीएम मशीन फोडण्याच्या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी विकास सुरेश रोकडे बनावट नोटांची छपाई करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
एटीएम फोडणारा आरोपी बनावट नोटाही छापत होता, पोलिसांनी साहित्य केले जप्त
एटीएम फोडणारा आरोपी बनावट नोटाही छापत होता, पोलिसांनी साहित्य केले जप्तसचिन आगरवाल
Published On

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील स्टेट बँकेचे एटीएम मशीन फोडण्याच्या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी विकास सुरेश रोकडे (वय१९,वडगाव सावताळ, पारनेर) बनावट नोटांची छपाई करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (The accused who broke into the ATM was also printing fake notes, police confiscated the material)

हे देखील पहा -

गेल्या आठवड्यात एटीएम मशीन फोडण्याच्या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. यातील आरोपी विकास रोकडे बनावट नोटा छापत असल्याचा पोलिसांना संशय होता. परंतु तो हा उद्योग नेमका कोठे करतो याबाबत स्पष्टता नव्हती. 'एटीएम' प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक एच.एन.उगले यांनी आरोपी रोकडे याच्या वडगाव सावताळ येथील घराची झडती घेतली असता, त्याच्या घरात ५०० व १०० रूपये दराच्या बनावट नोटा सापडल्या आहेत.

एटीएम फोडणारा आरोपी बनावट नोटाही छापत होता, पोलिसांनी साहित्य केले जप्त
ओबीसी आरक्षण देऊनच होणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका; नाना पटोलेंचा दावा

बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे रंग,छपाईचे यंत्र,विशिष्ट कागद, कात्री इत्यादी साहित्य आढळले. बनावट नोटांच्या छपाई प्रकरणी पारनेर पोलिसांनी विकास रोकडे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com