Thane Politics: शहापुरात मोठी राजकीय उलथापालथ! मविआच्या २७ मोठ्या नेत्यांचा भाजपात प्रवेश

MVA Weakens in Shahapur: शहापूर तालुक्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का. १४ सरपंच, ९ उपसरपंच, ४ पंचायत समिती सदस्यांसह २७ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश.
MVA Weakens in Shahapur
MVA Weakens in ShahapurSaam Tv News
Published On
Summary
  • शहापूर तालुक्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का.

  • १४ सरपंच, ९ उपसरपंच, ४ पंचायत समिती सदस्यांसह २७ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश.

  • भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा.

  • आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची ताकद वाढली.

संजय कवडे, साम टिव्ही

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक असताना राज्यातील राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. काही तालुक्यांत पक्षफोडीचं राजकारण सुरू असून, शहापूर तालुक्यात भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे. भाजपनं महाविकास आघाडीला धक्का दिला असून, महत्वाच्या नेत्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे.

शहापूर तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. शहापूर तालुक्यातील महत्वाच्या नेत्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. तब्बल १४ सरपंच, ९ उपसरपंच आणि ४ पंचायत समिती सदस्यांनी महाविकास आघाडीची साथ सोडली आहे. बड्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

MVA Weakens in Shahapur
२० वर्षांची साथ संपली; बड्या नेत्याची मनसेतून हकालपट्टी, भाजपात जाणार?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला जोरदार धक्का मानला जात आहे. २७ मोठ्या नेत्यांनी महाविकास आघाडीची साथ सोडून भाजपची साथ दिल्यामुळे भाजप पक्षाची ताकद वाढली असल्याची गावागावात तसेच राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

MVA Weakens in Shahapur
..तर PM-CMची खूर्ची जाणार; १३० व्या घटनादुरूस्ती विधेयकेवर अमित शहा काय म्हणाले?

हा भव्य पक्षप्रवेश सोहळा भाजप कार्यालयात पार पडला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला असून, यावेळी त्यांनी भाजपाची ताकद वाढली असल्याचं सांगितलं.

MVA Weakens in Shahapur
'आईला लाईटरनं जाळलं' नवऱ्यानं ७ वर्षीय चिमुकल्यासमोर बायकोला संपवलं, ३५ लाखांसाठी छळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com