Bird Flu : बर्ड फ्लूचा धोका वाढतोय; ठाण्यात २१ कोंबड्या, २०० अंडी केली नष्ट

Thane News : रायगडमध्ये ४ हजार कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली. तर लातूरमध्ये देखील ४२०० कोंबड्यांच्या पिल्लांचा मृत्यू झाला. यानंतर आता ठाणे शहरात देखील काही भागात बर्ड फ्लू झाल्याचे निदर्शनास आले
Thane News
Thane NewsSaam tv
Published On

ठाणे : पक्षांमध्ये बर्ड फ्लूची लागण होत असल्याचा धोका वाढत चालला आहे. राज्यात काही ठिकाणी हि लागण वाढत असल्याने काळजी घेतली जात आहे. दरम्यान ठाण्यात देखील बर्ड फ्लूची लागण झालेल्या २१ कोंबड्या व २०० अंडी नष्ट करण्यात आली आहेत. दरम्यान जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून खबरदारी म्हणुन एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या नष्ट केल्याची माहिती समोर आली आहे. 

राज्यात बर्ड फ्लू पुन्हा परतला असून राज्यातील लातूर व रायगड जिल्ह्यात कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे. रायगडमध्ये ४ हजार कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. तर लातूरमध्ये देखील ४२०० कोंबड्यांच्या पिल्लांचा मृत्यू झाला आहे. यानंतर आता ठाणे शहरात देखील काही भागात बर्ड फ्लू झाल्याचे निदर्शनास आले असल्याने या कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. 

Thane News
Jejuri Khandoba Devsthan : खंडोबा देवस्थानावर १० लाखाचे दागिने असलेली पर्स गहाळ; देवस्थान कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा, दागिने केले परत

चिकन- मटणची दुकाने बंद 
ठाणे शहरातील पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या शासकीय निवासस्थानी बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. बंगल्याच्या आवारात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महापालिकेने कोपरी परिसरातील चिकन मटण शॉप्स बंद ठेवण्याचे आदेश दिले. तर जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून परिसरात सर्च सुरू आहे. या सर्च दरम्यान जिल्हा पशुसंवर्धन विभागाने एक किलोमीटर परिसरात बर्ड फ्लुची लागण झालेल्या 21 कोंबड्या आणि 200 अंडी नष्ट केल्या आहेत. 

Thane News
Soyabean Purchase : सोयाबीन विक्रीसाठी आणलेल्या वाहनांच्या अर्धा किमीपर्यंत रांगा; तीन दिवसांपासून शेतकऱ्यांचा मुक्काम

दहा किलोमीटर परिसरात सर्वे 

तर पशुसंवर्धन विभागाकडून कोपरी आणि आसपासच्या १० किलोमिटर परिसरात सर्वे सुरू करण्यात आला आहे. त्यात पशुसंवर्धन विभागाकडून कोंबड्यांची तपासणी व आरोग्य विभागाकडून नागरिकांची तपासणी सुरू आहे. या मोहिमेदरम्यान आरोग्य विभागाने संशयित १७५ जणांची तपासणी केली असून त्यापैकी ७५ जणांचे स्वॅप घेतले आहेत. सुदैवाने ते सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती ठाणे महानगर पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतना नीतीला के यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com