अभिजीत सोनवणे
Thackeray Group Nashik City Chief Sudhakar Badgujar:
ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आज बडगुजर यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. फसवणूक आणि भ्रष्टाचारप्रकरणी ACB ने दाखल केलेल्या गुन्ह्यात बडगुजर यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.
नगरसेवक असताना पदाचा दुरुपयोग करून स्वत:च्याच कंपनीला कंत्राट देवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ACB ने बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात बडगुजर यांना ९ जानेवारीपर्यंत अंतरिम जामीन मिळवला होता.
मात्र सुनावणीवेळी न्यायालयात हजर न राहिल्याने आज बडगुजर यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आजच्या सुनावणीवेळी बडगुजर उपस्थित राहणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सलीम कुत्ता प्रकरणी गंभीर आरोप
गेल्या महिन्यात भाजप नेते नितेश राणे यांनी बडगुजर यांच्यावर आरोप केला होता की, त्यांचे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहीम याचा उजवा हात समजला जाणाऱ्या सलीम कुत्ताशी संबंध आहेत. या दोघांचे पार्टी करतानाचे व्हिडीओही माझ्याकडे आहेत, असे आरोप नितेश राणे यांनी केले होते. यानंतर देखील बडगुजर चांगलेच चर्चेत आले होते. मात्र सलीम कुत्ताशी माझा कोणताही संबंध नसल्याचं सुधाकर बडगुजर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं होतं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.