सांगली: शिक्षक पात्रता परीक्षेच्या घोटाळ्यात अपात्र ठरलेल्या जिल्ह्यातील सहा शिक्षकांची पगार ऑगस्ट महिन्यापासून रोखण्याचा निर्णय शिक्षण संचालक कार्यालयाकडून घेण्यात आला आहे. त्याबाबतचे आदेश सांगली जिल्हा परिषद (Sangli Zilla Parishad) प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. मात्र, सहापैकी चार शिक्षक सेवेत आहेत त्यांचे पगार रोखण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
2019 मधील शिक्षक पात्रता परीक्षेतील (TET Scam) गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर शासनाने 7 हजार 874 उमेदवारांना अपात्र ठरविले होते. त्यापैकी जवळपास 576 उमेदवार आजही विविध शाळामध्ये कार्यरत असल्याचे समोर आले. त्यांचे शालार्थ आयडी शिक्षण संचलन संचालनालयाने गोठवले आहेत.
पाहा व्हिडीओ -
त्यांचे वेतन ऑगस्टपासून रोखण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जिल्ह्यातील सहा शिक्षकांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून आली आहे. शासनाकडून आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा गैरप्रकारतील सहा व्यक्तिंपैकी एका व्यक्तीच्या मान्यता यापूर्वीच नाकारण्यात आली आहे. तर जागा रिक्त नसल्याने एका शिक्षकाचा शालार्थ आयडी काढलेला नाही. त्यामुळे उरलेले चार जण सध्या सेवेत असून त्यांचे पगार थांबवण्यात आले आहेत.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.