

धुळे: चाळीसगाव चौफुली येथे एसटी बस व ट्रकचा सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान अपघात झाला. या अपघातामध्ये बस चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. (Terrible accident of ST bus and truck in Dhule; ST bus driver dies on the spot in accident)
हे देखील पहा -
निमगूळहुन धुळ्याकडे येणाऱ्या एसटी बसला सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. चाळीसगाव चौफुली येथून धुळे शहराच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकहुन इंदोरच्या दिशेने माल वाहतूक करणार्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यानंतर वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत पोलला जाऊन धडकला. अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलीस तसेच महामार्ग पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. व जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.