Protest: अमित शाहांच्या बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तणाव, माथाडी कामगारांकडून आंदोलन

Amit Shah Statement: संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संविधानावर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे.
Amit Shah
Amit Shahyandex
Published On

राज्यसभेत भाषण करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी एक वक्तव्य केलं. यावेळी अमित शाह म्हणाले की, आंबेडकरांचे नाव घेणे ही एक फॅशन झाली आहे. सगळीकडे आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, म्हणायचे. त्यांनी देवाचे नाव इतक्या वेळा घेतले असते, तर स्वर्गात जागा मिळाली असती, असे शाह म्हणाले. शाहांनी केलेल्या या वक्तव्यांचे विधिमंडळात पडसाद उमटले असून विरोधकांना या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे.

याचप्रकरणी वातावरण तापलं असताना अशातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता सोलापूरात उमटले आहेत. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मध्यरात्री कामगारांनी आंदोलन पुकारलं आहे. दररोज शेकडो गाड्या कांदा घेऊन बाजार समितीत येत असतात.

Amit Shah
Badlapur Crime: झटपट पैसे कमावण्यासाठी अजब फंडा, YouTube वर पाहून चेन स्नॅचिंग करायचा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

रात्री बाजार समितीमध्ये हा कांदा उतरवला जातो, त्यानंतर सकाळी कांद्याचे लिलाव पार पडतात. मात्र, या आंदोलनामुळे शेतकऱ्यांनी आणलेला शेकडो क्विंटल कांदा गाडीतच रात्रभर थांबून राहिला. कामगारांनी स्पष्टपणे सांगितले की, शेतमाल गाडीतून उतरवला जाणार नाही, जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. यामुळे बाजार समितीतील कामकाज ठप्प झाले. पुण्यातही आंदोलन करण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेमुळे राजकीय वातावरण तापले आहे.

Amit Shah
Rajasthan: सासूच्या मृत्यूने दु:ख अनावर; रडत सुनेचाही मृत्यू, एकाच चितेवर दोघींचे अंत्यसंस्कार

माथाडी कामगारांच्या आंदोलनाची माहिती मिळताच सोलापूर पोलीस मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आंदोलक कामगारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र, कामगार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. या आंदोलनामुळे बाजार समिती परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी वर्ग कामगारांच्या आंदोलनामुळे त्रस्त झाला असून, लवकरच तोडगा निघावा अशी मागणी करत आहे. माथाडी कामगारांनी आंदोलनाचे कारण स्पष्ट केले असले, तरी प्रशासनाने या प्रकरणात हस्तक्षेप करून शांतता प्रस्थापित करावी, अशी मागणी समाजातून होत आहे.

Amit Shah
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या यादीत तुमचे नाव आहे की नाही कसे कराल चेक, एका क्लिकवर पाहा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com