सचिन कदम
Raigad Accident News : मुंबई-पुणे महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. मुंबई-पुणे महामार्गावर मालवाहू टेम्पोचा अपघात झाला आहे. मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात मेकॅनिक पॉईंट येथे अपघात झाला आहे. मालवाहू टेम्पो थेट दरीत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात चालकासह तिघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून बदलापूरकडे निघालेल्या मालवाहू टेम्पोला मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात मेकॅनिक पॉईंटजवळ भीषण अपघात झाला आहे. घाट रस्त्यावरील तीव्र उतारावर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटून हा मालवाहू टेम्पो 30 फुट दरीत कोसळून अपघात (Accident) झाला आहे. या अपघातामध्ये टेम्पो चालकासह तीन जण जखमी झाले आहेत.
अपघातग्रस्त टेम्पो झाडांमध्ये अडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. टेम्पोमध्ये चालक शाहरुख कुरेशी (वय वर्ष 28), अबूबकर कुरेशी (वय वर्ष 32) आणि वर्जेनिया फिलीप टाकार (वय वर्ष 53) सर्व राहणार पुणे अशी जखमींची नाव आहेत. सर्व जखमींवर जखमींवर खोपोली नगर पालिका रुग्णालयामध्ये प्रथोमोपचार करून अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.