Kolhapur News: आंघोळीने केला घात; २ सख्या भावांचा तळ्यात बुडून दुर्दैवी अंत

कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील भामटे येथील दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
kolhapur News
kolhapur NewsSaam tv
Published On

रणजीत माजगांवकर

Kolhapur News : कोल्हापुरातून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील भामटे येथील दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज, रविवारी दुपारी १२ वाजणाच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

kolhapur News
Kochu Preman:मल्याळम विनोदी अभिनेते कोचु प्रेमन यांचे निधन; वयाच्या ६८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील भामटे येथून धक्कादायक घटना घडली आहे. करवीर तालुक्यातील भामटे येथील दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. राजवीर पाटील आणि समर्थ पाटील असे तळ्यात मृत झालेल्या भावांची नावे आहेत.

रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गाव तळ्यात आंघोळ करण्यासाठी गेले होते. मात्र, दोघा भावांना पाण्याचा अंदाज न आल्याने तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुर्दैवी घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दोघांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com