मजुर घेऊन चाललेला टेम्पो पलटी; एक ठार, 7 जखमी
मजुर घेऊन चाललेला टेम्पो पलटी; एक ठार, 7 जखमीSaam TV

Beed: मजुर घेऊन चाललेला टेम्पो पलटी; एक ठार, 7 जखमी

बीडच्या गेवराई तालुक्यातील घटना
Published on

बीड - मजूरांसह कापूस भरण्यासाठी चाललेला भरधाव वेगातील टेम्पो अचानक पलटी झाल्याने, या अपघातात टेम्पोतील 1 जण ठार तर एका 15 वर्षीय मुलाचा हात कोपरापासून तुटला असून अन्य 7 मजूर जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना गेवराई-माजलगाव राज्य रस्त्यावरील सुर्डी बुद्रुक येथे घडली आहे.

हे देखील पहा -

अनिल एकनाथ लव्हाळे, वय 30 रा. टाकरवण असं अपघातात मयत झालेल्या मजुराचे नाव आहे. तर गणेश कोटूळे, रमेश भोसले, जालींदर पटेकर, गोविंद लव्हाळे, बाळू लव्हाळे सर्व रा. टाकरवण जखमी झाले आहेत.

मजुर घेऊन चाललेला टेम्पो पलटी; एक ठार, 7 जखमी
Pune | ..अन मुलाच्या डोक्यात घुसली लोखंडी सळई !; पाहा हा धक्कादायक व्हिडीओ

बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान यापैकी 15 वर्षीय कृष्णा लव्हाळे या मजूराचा कोपरापासून हात बाजूस तुटून पडल्याने त्याची प्रकृती चिंताजनक बनल्याने, त्यास औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com