Tea Price: सर्वसामान्यांच्या खिशाला चटका, कटिंग चहा २ रूपयांनी महागला

Tea Price Hike: सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता चहाच्या किंमतीत दोन रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे चहाप्रेमींच्या खिशालाच चांगलाच फटका बसणार आहे.
Tea Price
Tea PriceSaam Tv
Published On

चहा प्रेमींसाठी महत्वाची बातमी आहे. आज पासून मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात चहा 2 रुपयांनी महाग झालेला आहे. तुम्ही जर चहा 8 रुपयाला पीत असाल तर तो 10 रुपये, 10 रुपयाला पीत असेल तर तो 12 रुपये आणि 12 रुपयांना पीत असाल तर तो 14 रुपये करण्यात आलेला आहे. आसाम, गुहाटी, केरळ या ठिकाणी चहा पत्तीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात येतं.

चहाच्या माळ्यातून चहा पत्तीचा लिलाव करतानाच भाव वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रति किलो 10 ते 12 रुपयांची वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे चहा कपामागे दोन रुपये भाव वाढ करण्याचा निर्णय टी कॉफी असोसिएशन ऑफ इंडिया ने घेतलेला आहे. या भाव वाढीचा फटका चहाप्रेमी ग्राहकना बसणार असून चहा कपामागे 2 रुपयांची वाढ सरासरी होत आहे.

Tea Price
LIC Scheme: केंद्राची महिलांसाठी खास योजना! महिन्याला मिळणार ७००० रुपये; विमा सखी योजना नक्की आहे तरी काय?

चहाच्या उत्पादनात घट झाल्यामुळे जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान भारतीय चहाच्या किमती 18% वाढल्या आहेत. या वर्षी 66.39 दशलक्ष किलोने घट झाली आहे. चहा पत्तीचे प्रोडक्शन कमी झाल्याने चहा भाव वाढ होणार आहे. चहाच्या बागांमध्ये मॅनपावर कमी असल्याने बसतोय चहा व्यवसायाला फटका बसला आहे.

ग्लोबल वॉर्मिंगचा देखील चहा बागांवर मोठा परिणाम होतोय. राज्यात 11 कोटी लोकसंख्या, त्यापैकी अंदाजे पाच ते साडेपाच कोटी लोक किमान दोन वेळा चहाचे सेवन करतात. राज्यात चहा व्यवसाय मागे दिवसाला 30 ते 50 कोटी रुपयांची उलाढाल होते. केवळ मुंबई शहरात सात हजाराहून अधिक छोटे-मोठे चहा विक्रेते आहेत.चहा पत्ती भाव वाढीचा फटका सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला

चहा व्यवसायाचे योगदान जीडीपीमध्ये महत्त्वाचं मानलं जातं. चहाच्या बागांमधील चहापत्ती काढण्यापासून ते थेट आपल्या घरापर्यंत कपामध्ये चहा पडण्यापर्यंतचा प्रवास असतो. आपण जेव्हा कामानिमित्त ऑफिस किंवा बाहेर दिवसभर असतो त्यावेळी हॉटेल्स किंवा रोड शेजारी असणाऱ्या चहा टपरीवर आपण आवर्जून चहा पीत असतो... हा चहा किमान दहा रुपये कप प्रमाणे आपण पीत असतो, मात्र आज होणाऱ्या भाववाढीमुळे हाच चहा आपल्याला दोन रुपये महाग मिळणार आहे.

Tea Price
Union budget 2025: अर्थसंकल्पात दारूच्या दरात वाढ नाही, तरी महाग होणार? जाणून घ्या कारण

आपल्या देशात चहा व्यवसाय जरी छोटा वाटत असला, तरी या व्यवसायात करोडो नागरिक हा व्यवसाय करत आहेत. दिवसाला केवळ मुंबईत 30 ते 40 कोटी रुपयांची उलाढाल केवळ चहाच्या व्यवसायामध्ये होत असते, याच्यावरून चहा उद्योग जरी छोटा दिसत असला तरी त्याची व्याप्ती किती मोठी आहे हे आपल्या लक्षात येतं. आपल्या देशात चहा पिणाऱ्यांची संख्या देखील काही कमी नाही... मात्र या चहाप्रेमींना आता आपल्या चहासाठी दोन रुपये अधिकचे मोजावे लागणार आहे.

Tea Price
Mumbai Municipal Corporation Budget: BMC चा बजेट 'BEST'साठी ठरला 'बेस्ट'; एक हजार कोटींची तरतूद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com