Crime News : ताम्हिणी घाटात घडला रक्तरंजित थरार; मित्रानेच घेतला मित्राचा जीव, धक्कादायक कारण आले समोर

Raigad Tamhini Ghat Youth Killed in Car : रायगडमधून धक्कादायक प्रकार समोर आला असून पुण्याहून महाबळेश्वरला फिरायला निघालेल्या २२ वर्षीय तरुणाची मित्रांनीच पैशांच्या वादातून निर्घृण हत्या केली. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
Crime News : ताम्हिणी घाटात घडला रक्तरंजित थरार; मित्रानेच घेतला मित्राचा जीव, धक्कादायक कारण आले समोर
Raigad Tamhini Ghat Youth Killed in CarSaam Tv
Published On
Summary
  • पुण्याहून महाबळेश्वरला फिरायला जात असताना तरुणाची हत्या

  • पैशांच्या वादातून मित्रांनीच केली तरुणाची गळा दाबून हत्या

  • मृतदेह रस्त्यालगत फेकून आरोपींनी पळ काढला

  • पोलिसांनी तांत्रिक तपास करत आरोपींना अटक केली

Raigad Tamhini Ghat Youth Killed in Car रायगडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्याहून महाबळेश्वरला फिरण्यासाठी निघालेल्या तरुणाची मित्रानेच निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. प्रवासादरम्यान झालेल्या पैशांच्या शुल्लक वादातून ही हत्या करण्यात आली. त्यांनतर मृतदेह कारमधून रस्त्यावर फेकून आरोपींनी पळ काढला. मात्र कानून के हात लंबे होते है, त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत या घटनेतील आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना रविवारी म्हणजेच ११ जानेवारी रोजी रात्री साडेअकराच्या दरम्यान सणसवाडी गावच्या हद्दीतील सिक्रेट पॉईंट परिसरात एका २५ ते ३० वयोगटातील तरुणाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला.

Crime News : ताम्हिणी घाटात घडला रक्तरंजित थरार; मित्रानेच घेतला मित्राचा जीव, धक्कादायक कारण आले समोर
Viral Video : हॉटेल रूमसाठी ऑनलाइन बुकिंग करताना चुकीची लिंक क्लिक झाली; तरुणीसोबत असं काही घडलं की ढसाढसा रडली, पाहा VIDEO

गुप्त बातमीदार, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासात मृतकाची ओळख आदित्य गणेश भगत (वर्षे २२) अशी निष्पन्न झाली. पुढील तपासात ही हत्या त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या मित्रांनीच केल्याचं उघड झालं. त्यांनतर पोलिसांनी सापळा रचून मृत आदित्यच्या मित्रांच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांची चौकशी केली.

Crime News : ताम्हिणी घाटात घडला रक्तरंजित थरार; मित्रानेच घेतला मित्राचा जीव, धक्कादायक कारण आले समोर
Kalyan Crime : लग्नाचं वचन देऊन लाखो रुपये उकळले, शरीर संबंध ठेवत मारहाण केली; नैराश्येत गेलेल्या एअर होस्टेसने जीवन संपवलं

आरोपींनी म्हटल्याप्रमाणे, पुण्याहून आदित्य भगत, अनिकेत महेश वाघमारे, तुषार उर्फ सोन्या शरद पोटोळे आणि प्रज्वल उर्फ सोन्या संतोष हंबीर हे चौघे इनोव्हा क्रिस्टा या वाहनातून पुण्याहून ताम्हणी घाट मार्गे महाबळेश्वरला फिरण्यासाठी निघाले होते. वाटेत या चौघांमध्ये पैशांवरून वाद उफाळला. या वादात संतापलेल्या तरुणाने आदित्यचा गळा दाबला आणि त्याची हत्या केली. इतक्यावरच न थांबता या तरुणांनी आदित्यचा मृतदेह वाटेतच रस्त्यालगत फेकला. दरम्यान आदित्यच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com