Swabhimani Shetkari Sanghatana : पंढरपूर- कराड रस्त्यावर 'स्वाभिमानी' चा रास्ता राेकाे; साेनकेत वाहनांच्या रांगा

शेती पंपाचा वीज पुरवठा खंडीत करू नये या प्रमुख मागणीसाठी आंदाेलन छेडण्यात आलं.
Pandharpur, Rasta Roko Aandolan, swabhimani shetkari sanghatana
Pandharpur, Rasta Roko Aandolan, swabhimani shetkari sanghatanasaam tv

Pandharpur : एककीडे शेतीला (farm) मुबलक पाणी (water) दिले जात नाही. तर दूसरीकडे थकीत वीज बिलासाठी वसुलीसाठी महावितरण (mahavitran) शेतक-यांकडे (farmers) तगादा लावते. त्यामुळे संतापलेल्या शेतक-यांनी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (swabhimani shetkari sanghatana) समवेत साेनके रस्त्यावर रास्ता राेकाे आंदाेलन छेडले.

Pandharpur, Rasta Roko Aandolan, swabhimani shetkari sanghatana
Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांची अकाेला कारागृहातून हाेणार सुटका; वाचा न्यायालयाचा आदेश

शेतक-यांनी पंढरपूर - कराड मार्गावरील (pandharpur karad road) सोनके येथे रास्ता रोको आंदोलन केल्याने या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. आंदाेलनकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. त्यामुळेन वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या हाेत्या.

Pandharpur, Rasta Roko Aandolan, swabhimani shetkari sanghatana
Pandharpur Mhaswad Highway : उपरी पूलाला तडे; माेठी दुर्घटना घडण्याची वाट प्रशासन पाहत आहे का ?

शेती पंपाचा वीज पुरवठा खंडीत करू नये या प्रमुख मागणीसाठी हे आंदाेलन छेडल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सांगितले. तसेच वीज वितरण कंपनीने थकीत वीज बिल वसुलीसाठी तगादा लावला आहे. अनेक ठिकाणी शेती पंपाचा वीज खंडीत केला आहे. यामुळे शेतीला पाणी मिळू शकत नाही.

परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे. त्यामुळे आज शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी साेनके स्त्यावर उतरून आंदाेलन छेडले असेही शेतकरी संघटनेच्यावतीने सांगण्यात आले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com