Hingoli News: गुन्हेगारांसोबत रीलमध्ये दिसला, पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई

Police Discipline: गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांसोबत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करणं एका पोलीस अधिकारीसाठी मोठा समस्येचा कारण ठरला आहे.
Inspector Suspended
Inspector Suspendedsaam tv
Published On

संदीप नागरे/साम टीव्ही न्यूज

आता बातमी समोर आली आहे. साम टीव्हीच्या इम्पॅक्टची, गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांसोबत सोशल मीडियामध्ये व्हिडिओ प्रसारित होणे एका पोलीस अधिकार्‍याच्या चांगलेच अंगलट आले आहे. साम टीव्हीच्या बातमीनंतर हिंगोली पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक पद्माकर खंदारे यांचं पोलीस अधीक्षकांनी निलंबन केल आहे.

निलंबित पोलीस उपनिरीक्षक पद्माकर खंदारे हे सेनगाव पोलीस स्थानकात कर्तव्यावर होते. यावेळी त्यांचे वाळू माफिया आणि गुंड प्रवृत्तीच्या असलेल्या एका तरुणांसोबत व्हिडिओ व्हायरल झाले होते. भाऊ राठोड असे या सोशल मीडियावर रिल्स बनवत असलेल्या तरुणाचे नाव असून हा भाऊ राठोड कधी टेबलवर नोटांचे बंडल तर कधी नदीमध्ये अवैध वाळू उपसा करताना व्हिडिओ बनवत होता. या व्हिडिओमध्ये टिप्पर बोट यासह जेसीबी देखील दिसत होती.

Inspector Suspended
Tourism Fraud: लोणावळा-कर्जत व्हिला बुकिंग घोटाळा; ऑनलाइन फसवणुकीचा पर्दाफाश, आरोपी पुण्यात गजाआड

भाऊ राठोडच्या याच व्हिडिओमुळे समाजात दहशत देखील निर्माण झाल्याचा आरोप सेनगाव शहरातील नागरिकांनी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केला होता. या सगळ्या प्रकरणानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांनी रिल्स बनवणाऱ्या भाऊ राठोडला ताब्यात घेत समाचार घेतला त्यानंतर या भाऊ राठोडने सोशल मीडिया यापुढे आपण कोणताही व्हिडिओ प्रसारित करणार नाही असे म्हणत माफी देखील मागितली होती.

Inspector Suspended
Tourism Fraud: लोणावळा-कर्जत व्हिला बुकिंग घोटाळा; ऑनलाइन फसवणुकीचा पर्दाफाश, आरोपी पुण्यात गजाआड

मात्र साम टीव्हीच्या बातमीनंतर आरोपीसोबत व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने कार्यवाही करा अशी मागणी विधिमंडळात भाजप आमदार परीनय फुके यांनी केल्यानंतर आता मात्र पोलीस अधीक्षकांनी पोलीस उपनिरीक्षकांचे निलंबन केले आहे. या सगळ्या प्रकरणात मात्र व्हिडिओत आरोपी सोबत दिसणे पोलीस अधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे.

Inspector Suspended
Mega Block: प्रवाशांचा होणार खोळंबा! रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक, कसं असेल वेळापत्रक? वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com