Suresh Dhas: धसांचा डाव, मुंडेंवर घाव? 'कृषी घोटाळ्याची SIT चौकशी करा'

Munde Under Fire Again: कृषीखात्यात तब्बल 169 कोटींचा घोटाळा झालाय, असं सांगत सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची कोंडी केलीय... मात्र हा घोटाळा नेमका कसा झाला?
Suresh Dhas targets Dhananjay Munde over fresh ₹169 crore agriculture scam allegations
Suresh Dhas targets Dhananjay Munde over fresh ₹169 crore agriculture scam allegationsSaam Tv
Published On

कोटींच्या कृषी साहित्य खरेदी घोटाळ्यात उच्च न्यायालयाने धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाली... मात्र आता भाजप आमदार सुरेश धसांनी धनंजय मुंडेंविरोधात आरोपांचा फास आवळायला सुरुवात केलीय..तब्बल 78 बोगस कंपन्या स्थापन खतांच्या लिंकिंगचं पाप केल्याचा खळबळजनक आरोप सुरेश धसांनी मुंडेंवर केलाय.. तर धसांनी या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची मागणी केलीय...

खरंतर धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना डीबीटी योजनेला फाटा देत 275 कोटींच्या कृषी साहित्याची खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता.. मात्र याच प्रकरणात कोर्टाने क्लीन चिट दिली आणि धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याचे संकेत अजित पवारांनी दिले... त्यामुळे पुन्हा मुंडेंविरोधात धसांनी थेट कृषी खात्याच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून आरोपांची राळ उडवून दिलीय.....

मुंडे व त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने 169 कोटींचा घोटाळा

घोटाळ्यासंदर्भात 54 पानी पत्र दिल्याचा दावा

प्रकरण उच्च न्यायालयात असल्याचा दाखला देत चौकशी समितीची घोषणा नाही

सरकारी वकिलांकडून उच्च न्यायालयात गैरव्यवहार झाला नसल्याचा युक्तीवाद

गैरव्यवहार झाला नसल्याचा युक्तीवाद कोणत्या अहवालाच्या आधारे केला, त्याची प्रत द्यावी

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडमुळे मुंडेंची मंत्रिमंडळातून विकेट पडली.. मात्र आता मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याच्या हालचाली सुरु झाल्याने धसांनी मुंडेंवर नेम साधलाय.. त्यामुळे धनंजय मुंडेंवरील आरोपांची चौकशी करुन सत्य बाहेर येणार की आरोपांकडे दुर्लक्ष करुन अजित पवार मुंडेंना मंत्रिमंडळात संधी देणार? याचीच उत्सुकता लागलीय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com