Maharashtra politics: काल भेट आणि आज धस मंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधात आक्रमक, कृषि विभागाकडे मागितली 'त्या' निर्णयांची माहिती

Suresh Dhas Demands Information from Agriculture Department: आमदार सुरेश धस यांनी कृषि विभागाच्या सचिवाला पत्र लिहून मागवली माहिती
Suresh Dhas on dhananjay munde
Suresh Dhas on dhananjay munde saam tv
Published On

मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपचे आमदार सुरेश यांनी पुन्हा एकदा हत्यार उपसल्याचे पाहायला मिळत आहे. सुरेश धस यांनी कृषि विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना पत्र लिहून तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती द्या अशी मागणी केली आहे. तेलबियांच्या उत्पादकता वाढीसंदर्भातील निर्णयांची माहिती सुद्धा सुरेश धस यांनी आता या पत्रामधून मागवली आहे. तर २०२० ते २०२५ पर्यंतच्या पत्रव्यवहाराची माहिती द्या, अशी मागणी करत सुरेश धस यांनी प्रधान सचिवांना हे पत्र लिहिले आहे.

Suresh Dhas on dhananjay munde
Sanjay Raut on Suresh Dhas: 'सुरेश धस कधीही पलटी मारतील', धस-मुंडेंच्या भेटीवरून राऊत कडाडले

तसेच कापूस, सोयाबीन, तेलबियांची उत्पादकता वाढविण्यासाठी केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती द्या, अशी मागणी धसांनी केली आहे. तर खरेदीच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या वेगवेगळ्या तक्रारी आल्याचं सुरेश धस यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे. याचबरोबर कृषी मंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकारी यांचे एकमेकांशी लागेबांधे होते, कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप सुद्धा सुरेश धस यांनी केला आहे.

त्या दिवशी बंद दाराआड चार तास चर्चा

दोन दिवसापूर्वी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याच्या बातम्या मध्यमांमध्ये झळकल्या. त्यानंतर स्वतः धस यांनी माध्यमांसोबत संवाद साधून भेट घेतल्याचे स्पष्ट केले. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंडे आणि धस यांच्यात तब्बल चार तास चर्चा झाली असा गौप्यस्पोट केला. त्यानंतर धस यांच्यावर चांगलेच टीकेचे झोड उठले. धस यांच्याकडून ही भेट फक्त तब्येतीची विचारपूस करण्यासाठी झाल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com