Latur : अजित पवारांच्या शिलेदाराला मध्यरात्री बेड्या, लातूरमधील मारहाण भोवली

Chhava Sanghatana activist Vijay Ghadge : लातूरमध्ये छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना केलेल्या मारहाणी प्रकरणी राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. लातूर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
Maharashtra Politics
Suraj Chavan arrested by Latur Police in connection with attack on Chhava leader Vijay GhadgeSaam tv
Published On
Summary
  • लातूरमध्ये छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना मारहाण झाली होती.

  • विजय घाडगे प्रकरणात सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे.

  • याघटनेमुळे राज्यभर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

  • विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

Ajit Pawar's response to Suraj Chavan attack controversy : लातूरमध्ये छावा संघटनेच्या विजय घाडगे यांना मारहाण केल्याप्रकरणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांच्यासह १० जणांना अटक करण्यात आली आहे. लातूरमध्ये गेल्या आठवड्यात सुनील तटकरे यांच्यासमोरच छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. त्याचे पडसाद राज्यात उमटले होते. अजित पवार यांनी सूरज चव्हाण याच्याकडून पदाचा राजीनामाही घेतला होता. आता लातूरमध्ये सूरज चव्हाण यांच्यासह १० जणांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सुरज चव्हाण पोलिसांना शरण आले आहेत. पोलिसांकडून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून अटक करण्यात आली आहे. (Ajit Pawar’s NCP Leader Held Over Brutal Assault on Chhava Activists in Latur)

छावाचे विजय घाडगे मारहाण प्रकरणातील राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण यांच्यासह 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुरज चव्हाण आणि काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. दरम्यान या हल्ल्यात विजयकुमार घाडगे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या लातूरमधील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरज चव्हाण यांच्यासह 11जणांवर लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाणे गुन्हे दाखल आहे. सुरज चव्हाण यांच्यासह 10 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर येत आहे.

Maharashtra Politics
Kalyan : हप्ते वसुली, दरोडा अन् मारहाण; मराठी तरुणीला मारणाऱ्या परप्रांतीय गोकुळचा कच्चाचिठ्ठा उघड

नेमकं प्रकरण काय आहे ?

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधानसभागृहात ऑनलाइन गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. शेतकरी संकटात असताना कृषीमंत्री सभागृहातच ऑनलाइन गेम खेळत असल्यामुळे राज्यातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणामुळे सुनील तटकरे यांच्यासमोर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लातूरमध्ये आंदोलन केले अन् निवेदन दिले. यावेळी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले अन् सूरच चव्हाण यांचा राग अनावर झाला. सूरच चव्हाण आणि १० जणांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. यामध्ये छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. विजयकुमार घाडगे यांच्या मारहाणीवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले. तटकरे यांच्याकडूनही या घटनेबाबत खेद व्यक्त केला. अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांच्याकडून पदाचा राजीनामा घेतला. आज त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

Maharashtra Politics
धक्कादायक! ओबीसी मुलींच्या हॉस्टेलमध्ये २ जण घुसले, विद्यार्थीनीचा विनयभंग केला अन्
Q

सूरज चव्हाण कोण आहेत?

A

सूरज चव्हाण हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व नेते आहेत.

Q

विजय घाडगे यांच्यावर हल्ला कसा झाला?

A

लातूरमध्ये सुनील तटकरे यांच्यासमोरच छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना सूरज चव्हाण व त्यांच्या समर्थकांनी बेदम मारहाण केली.

Q

या प्रकरणात कोणती कारवाई झाली?

A

पोलिसांनी सूरज चव्हाण यांच्यासह १० जणांना अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे.

Q

अजित पवारांकडून काय कारवाई?

A

अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांच्याकडून पदाचा राजीनामा घेतला असून या घटनेवर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com