Supriya Sule: सुप्रिया सुळेंनी वर्मावर बोट ठेवलं, भुजबळांच्या नाराजीवरून निशाणा साधला; म्हणाल्या, आमच्यासोबत असताना...

Supriya Sule on Chhagan Bhujbal: भुजबळ हे जरी नाराज असले तरी, हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे. जेव्हा ते आमच्याकडे होते. तेव्हा त्यांचा आम्ही यथोचित सन्मान केला. सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीवर भाष्य केलं.
Supriya Sule on chhagan bhujbal
Supriya Sule on chhagan bhujbalSaam TV
Published On

१५ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. काही ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळं भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा आहे.'भुजबळ हे जरी नाराज असले तरी, हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे. पण छगन भुजबळ हे जेव्हा शरदचंद्र पवार गटात होते. तेव्हा त्यांचा आम्ही यथोचित मान-सन्मान केला. तसेच त्यांची जागा नेहमी शरदचंद्र पवार यांच्या शेजारी असायची.'असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

भुजबळ यांची जागा शरदचंद्र पवार यांच्या शेजारी होती

'भुजबळ हे जरी नाराज असले तरी, हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे. पण ते जेव्हा शरदचंद्र पवार गटात होते. तेव्हा त्यांचा आम्ही यथोचित सन्मान केला. तसेच त्यांची जागा नेहमी शरदचंद्र पवार यांच्या शेजारी असायची. दीड ते दोन वर्षात जे काही झालं त्यात मला पडायचं नाही. असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Supriya Sule on chhagan bhujbal
Chhagan Bhujbal : भुजबळांनी पवारांची साथ सोडली, आता कर्माची फळं भोगत आहेत, मंत्रिपदावरून राऊतांचा खोचक टोला

आमदारांचे रूसवे फुगवे पाहिले

सगळ्या चॅनलवर आमदारांचे रूसवे फुगवे पाहिले. एवढं यश मिळालं ते आनंद साजरा करून तुम्ही कामाला लागायला पाहिजे होतं. भारताचा जीडीपीचा दर निचांक गाठत आहे. माझी अपेक्षा आहे, यांनी लवकर काम करायला सुरूवात करायला हवं होतं. असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या कामावर भाष्य केलं. तसंच खातेवाटपावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला.

Supriya Sule on chhagan bhujbal
Supriya Sule: जानेवारीपासूनच लाडक्या बहिणींना २१०० रूपये द्या, सुप्रिया सुळेंची मागणी

अद्यापही खाते वाटप नाही, असे का?

सरकार सत्तेत येऊन ३ आठवडे झालेत. पण अद्यापही खातेवाटप झालेलं नाही. महाराष्ट्रात असं का होत आहे? ही बाब राज्याला न शोभणारी तसेच अस्वस्थ करणारी आहे. एवढं मोठं बहुमत मिळालं, तरी देखील राज्याला गृहमंत्री नाही. असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली.

मुख्यामंत्र्यांकडून अपेक्षा

परभणी हिंसाचारप्रकरणी अटकेत असलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. सोमनाथ यांचा कोठडीत मृत्यू झालाच कसा? हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कोठडीत मृत्यू हा वेगळा विषय आहे. राज्याला आज मंत्री आहेत, पण खातेवाटप नाही. मी विरोधक असले तरी, मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्याकडून खुप अपेक्षा आहेत. बीडमधील घटना चिंता निर्माण करणारी आहे. असे विषय त्यांनी गांभीऱ्याने घ्यावेत. असं मुख्यामंत्र्यांकडून असणाऱ्या अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या.

तसेच, माणुसकीच्या नात्यानं तिथे काय सुरू आहे, हे पाहण्यासाठी आम्ही तिथं गेलं पाहिजे. लोक अस्वस्थ असतील तरी त्यांना आम्ही लोकांनी आधार दिला पाहिजे. राज्यातील लोकांना आधार देण्याची गरज आहे. असं सुप्रिया सुळे यांनी परभणी आणि बीडमध्ये घडलेल्या घटनेवर, लोकांना आधार देण्याची गरज असल्याचं म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com