घराबाहेर काढलेल्या वृद्धेसाठी धावल्या रोहित पवारांच्या मातोश्री

आ. रोहित पवार यांच्या मातुःश्री सुनंदाताई यांनी भांबोरा येथील निराधार आजींना आधार देत हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
आ. रोहित पवार यांच्या मातुःश्री सुनंदाताई यांनी भांबोरा येथील निराधार आजींना आधार देत हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. SYSTEM
Published On

अहमदनगर : दमलेलं- थकलेलं शरीर. वय शंभरीजवळ पोचलेलं. एकेक अवयव गलितगात्र झालेले. सर्व काही दुसऱ्यांवर अवलंबून असताना, ज्यांच्यासाठी उभं आयुष्य पणाला लावलं, त्याच नातेवाइकांनी हलाखीच्या परिस्थितीमुळे आयुष्याच्या संध्याकाळी गावच्या मंदिरात सोडलेल्या भांबोरे (ता. कर्जत) येथील रुक्मिणी खुडे (वय ९७) या आजींची परवड पाहून, त्यांच्या मदतीसाठी बारामती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार धावून आल्या आणि खुडे आजींना पुण्यात त्यांची काळजी घेणारे हक्काचे माहेर मिळाले. Sunanda Pawar took care of an old woman from Bhambora

खुडे आजींचा गतकाळ समृद्ध, संपन्न होता. पती भांबोऱ्याचे सरपंच होते. त्यांचा किराणा दुकानदारीचा व्यवसाय होता. मात्र, या दाम्पत्याची पुढील पिढी व्यसनाधीन निघाली आणि त्यातच पतीचा अंत झाला. सध्याच्या पिढीने आजीस मंदिरात सोडले. जवळ काळजी घेणारे कोणी नाही. पोटात अन्नाचा कण नसल्याने अंगात त्राण राहिले नाही. त्यामुळे आजींना नीट उभेसुद्धा राहता येईना.

आ. रोहित पवार यांच्या मातुःश्री सुनंदाताई यांनी भांबोरा येथील निराधार आजींना आधार देत हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
पाथर्डीत भाजपसमोर विखे फॅक्टरचेच आव्हान

भांबोऱ्याच्या सरपंच माधुरी लोंढे पाटील यांनी ही कहाणी सुनंदा पवार यांच्या कानावर घातली. त्यांनी विनाविलंब भांबोऱ्यात येऊन त्यांची विचारपूस केली. त्यांना दवाखान्यात नेले. सलाईन लावून हलका आहार दिला. त्याने आजी सावरल्या. बसायला लागल्या. उभा राहिल्या, मात्र या आजींची कायमस्वरूपी काळजी घेणारे कोणी तरी पाहिजे, म्हणून पुण्यातील माहेर या संस्थेला पवार यांनी खुडे आजींबाबत माहिती दिली. ही संस्था नातेवाइकांनी सोडून दिलेल्या महिलांना आधार देते. या संस्थेने खुडे आजींसाठी माहेरचे दरवाजे उघडले. पवार यांनी त्यांना पुण्यात पाठविले. आज आजी त्या संस्थेत सुरक्षित वातावरणात सुखरूप आहेत.

राजकारण- समाजकारण करीत असताना वंचित- उपेक्षित घटकांसाठी धावून जात, त्यांची आस्थेवाईकपणे काळजी घेणाऱ्या पवार यांच्यात यानिमित्ताने हळव्या व संवेदनशील मनाच्या लेकीचे दर्शन घडले. शिवाय, त्यांची समाजाप्रती असणारी बांधिलकी अधोरेखित झाली. केवळ गप्पा न मारता हे विधायक काम केल्याने, भांबोरे व राशीनसह परिसरातून पवार यांचे विशेष कौतुक होत आहे. Sunanda Pawar took care of an old woman from Bhambora

ज्या कुटुंबात ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांनी आपली जबाबदारी ओळखून प्रेमाने सांभाळ करावा. आयुष्याचा हा कठीण काळ सुखासमाधानात जावा, यासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत.

- सुनंदा पवार, विश्वस्त, बारामती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com