पाथर्डीत भाजपसमोर विखे फॅक्टरचेच आव्हान

डॉ. सुजय विखे पाटील
डॉ. सुजय विखे पाटील

अहमदनगर ः गेल्या काही दिवसांपासून खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर दक्षिण मतदारसंघात लक्ष घातले आहे. पारनेर, श्रीगोंद्यानंतर आता त्यांचे टार्गेट आहे पाथर्डी तालुका. भारतीय जनता पक्षाची ताकद आमदार मोनिका राजळे यांच्या रूपाने आहे. मात्र, विखे यांची आघाडीही तेथे कार्यरत आहे. अभय आव्हाड हे विखेसमर्थक मानले जातात.

नगरपालिका निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी आघाडीसमोर अभय आव्हाड यांची तिसरी आघाडी उभी ठाकू शकते. आव्हाड हे गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्यांची मदार तरूणांवर आहे. Vikhe Factor's challenge to BJP in Pathardi

डॉ. सुजय विखे पाटील
भाजपच्या वाघांचे शिवसेनेच्या वाघांना चॅलेंज, ही अटक करून दाखवा

पार्थ विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष आव्हाड यांनी पालिकेत नगराध्यक्ष असताना शहराच्या विकासाची केलेली कामे आजही शहरवासीयांच्या स्मरणात आहेत.

प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होऊन, राजकारण बाजूला ठेवून शहरविकास, शिक्षण, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने काम सुरू आहे. आव्हाड भाजपमध्ये असले, तरी जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरल्यापासून आमदार मोनिका राजळे व आव्हाड यांच्यातील दरी वाढत गेली. राजळे यांनीदेखील शहरातील व पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला आव्हाड यांना बोलाविले नाही. आव्हाड यांनीही त्यांच्याकडे होणाऱ्या कार्यक्रमासाठी राजळे यांना निमंत्रण दिले नाही.

आव्हाड यांनी शहरात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करण्याचा निर्धार केला आहे. गेल्या वर्षभरापासून ते राजकीय समीकरणे जुळवीत आहेत. राजळे-ढाकणे यांच्या राजकीय संघर्षात आव्हाड नशीब अजमावणार आहेत. त्यांना बाजूला ठेवण्याचा डाव राजळे व ढाकणे यांच्याकडून खेळला जात असल्याचे आव्हाड समर्थक बोलून दाखवीत आहेत.

आव्हाड हे भाजपत असले तरी त्यांना आमदार राजळे यांच्याकडून सन्मानाची वागणूक मिळत नाही. त्यामुळेच त्याचे कार्यकर्ते चिडलेले आहेत. या निवडणुकीत ते उट्टे काढण्याची त्यांची तयारी आहे.Vikhe Factor's challenge to BJP in Pathardi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com