साखर महागली, ग्राहकांची पळापळ; बाजारात प्रतिव्यक्ती 1 किलोच साखर

One Person, One Kilo: साखरेचे दर वाढल्याने अनेकांचा चहा फिका झालाय. त्यातही काही मॉलमध्ये प्रतिव्यक्ती फक्त 1 किलो साखर मिळणार असे फलक झळकल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे. महागाईच्या वणव्यात ऐन सणासुदीला साखर कडू झाल्याने गृहीणींचं बजेट कोलमडलंय. पाहूया एक रिपोर्ट
sugar price hike in Maharashtra before Ganeshotsav 2026
sugar price hike in Maharashtra before Ganeshotsav 2026saam tv
Published On

ही दृश्ये पाहा...गर्दी आवरण्यासाठी चक्क पोलिसांना यावं लागलं. तुम्हाला वाटेल काहीतरी मोफत योजना आहे किंवा सरकारी लाभ मिळतोय म्हणून ऐव्हढी झुंबड उडाली आहे. पण तसं नाही ही लांबच लांब रांग चक्क साखर घेण्यासाठी आहे. सोलापूरच्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याबाहेर झुंबड उडालीय. कारखान्याकडून प्रत्येक सभासद शेतकऱ्याला 50 किलो साखर दिली जाते. अचानक साखर वाटप सुरू झाल्याची माहिती मिळताच रांगा लागल्या. आधीच साखरेचे दर वाढल्यानं सगळ्याच सभासदांनी कारखान्याकडे धाव घेतली.

ऐन सणासुदीत साखरेचे दर 78 ते 80 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळेच शेतकरी सभासदांनी मोठी गर्दी केली होती. मात्र याचा अंदाज न आल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.

सोलापूर साऱखीच स्थिती राज्याच्या इतर भागात आहे. यामुळे अनेक ठिकाणी मर्यादित साखर मिळेल, असे फलक लावण्यात आले आहेत. बुलढाणा आणि खामगावच्या स्मार्ट बाजारातील ही सुचना पाहा. प्रतिव्यक्ती फक्त 1 किलो साखर मिळेल तर काही ठिकाणी फक्त 2 किलो साखर मिळेल अशी सूचना आहे. स्मार्ट बाजारात 66 रुपये किलोने साखर विक्री होतीय. मात्र साखरेच्या विक्रीवर निर्बंध लावण्यात आल्याने नागरिक धास्तावलेत. साखरेचे दर वाढल्याने अनेकांचा चहा फिका झालाय. गणेशोत्सव जवळ आलेला असतानाच साखरेसह तांदूळ, डाळींचे भाव वाढलेत. मोदक, पुरणपोळीवर तुपा ऐवजी महागाईची धार आहे. त्यामुळे साखरेची गोडी वाढण्यासाठी सरकार काय पाऊल उचलणार याकडे सामान्यांचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com