'जगदंब' तलवार पुन्हा भारतात आणण्याच्या हालचालींना वेग, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

जगदंब तलवार सध्या ब्रिटीश सरकारच्या ताब्यात आहे.
Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwarsaam tv
Published On

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंब तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. जगदंब तलवार पुन्हा आणणार असल्याचं राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूजेची ही तलवार होती.

जगदंब तलवार सध्या ब्रिटीश सरकारच्या ताब्यात आहे. ती पुन्हा मिळावी यासाठी केंद्र सरकारमार्फत पाठपुरावा करणार आहे. तसेच 2024पर्यंत तलवार आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.  (Maharashtra News)

Sudhir Mungantiwar
Deepali Sayyed : आज तुझा मेकअप उतरलाय, दिपाली सय्यद यांच्याविरुद्ध पुण्यात महिला शिवसैनिकांचा संताप

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ऋषी सुनक यांची निवड झाल्यानंतर केंद्र सरकारला आम्ही विनंती केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची विजयादशमीच्या पूजेची जी जगदंब तलवार होती, ती हिरेजडीत होती. इंग्रजांनी भारत सोडताना ती तलवार मोहापोटी नेली. पण त्या तलवारीला शिवाजी महाराजांचा पावन स्पर्श झाला आहे. आमच्यासाठी ती जगातल्या साऱ्या संपत्तीपेक्षाही अमुल्य आहे. म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं.

Sudhir Mungantiwar
Uddhav Thackeray : संजय राऊत यांना पुन्हा अटक होऊ शकते? उद्धव ठाकरे असं का म्हणाले?

केंद्र सरकारसोबत यासंबंधी आम्ही सांस्कृतिक मंत्रालयातर्फे पत्रव्यवहार सुरु केला आहे. ब्रिटनेच पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याची देखील चर्चा करुन जगदंब तलवार भारतात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. साधारण शिवराज्याभिषेकाला 2024 मध्ये 350 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या दृष्टीने विभागाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतो आहोत. जर ब्रिटनने तलवार परत केली तर आपल्यासाठी तो आनंदोत्सव असेल, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com