Deepali Sayyed-Pune Protest : शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर करणाऱ्या दिपाली सय्यद यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि रश्मी ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यानंतर आता शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. दिपाली सय्यद यांच्याविरुद्ध महिला शिवसैनिकांनी पुण्यात आंदोलन केलं आहे. दिपाली सय्यद, आज तुझा खरा मेकअप उतरला आहे, अशी टीका यावेळी महिला शिवसैनिकांनी केली.
दिपाली सय्यद (Deepali Sayyed) यांनी काल, बुधवारी शिंदे गटात जाणार असल्याची घोषणा केली. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली होती. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि रश्मी ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेनंतर महिला शिवसैनिक आक्रमक झाल्या आहेत.
पुण्यातील डेक्कन येथील गुडलक चौकात दिपाली सय्यद यांच्याविरोधात महिला शिवसैनिकांनी आंदोलन केलं. दिपाली सय्यद यांच्या फोटोला त्यांनी जोडे मारून निषेध व्यक्त केला. तसेच जोरदार घोषणाबाजीही केली. दिपाली सय्यद यांचा धिक्कार असो, अशा घोषणा दिल्या.
यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या म्हणाल्या की, 'दिपाली सय्यद यांच्याविरोधात शिवसेना महिला आघाडी आंदोलन करत आहे. खोके सरकारमध्ये एन्ट्री हवी असेल तर बहुतेक त्यांना एक टास्क दिला जात असेल. ठाकरे घरातील सदस्यांबद्दल अनुद्गार काढण्याचे ते टास्क असेल. रश्मी ठाकरेंवर दिपाली यांनी टीका केली.' आज तुझा खरा चेहरा समोर आला आहे. तुझा मेकअप उतरला आहे, अशी टीकाही या महिला शिवसैनिकांनी केली. (Maharashtra News)
यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी, नेत्यांनी दिपाली सय्यद यांना इशारा दिला. माध्यमांसमोर बोललीस. आमच्यासमोर बोलून दाखव मग काय करतो ते बघ. आम्ही महिलांनी मनगटात शिवबंधन बांधलं आहे. दिपाली सय्यद यांनी आत्मपरीक्षण करावं. पुन्हा मेकअप करण्याची गरज आहे, अशा शब्दांत या महिला शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.