नाचता येईना अंगण वाकडे; गृह खात्यावरून मुनगंटीवार यांची शिवसेनेवर टीका
काल मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये मंत्र्यांनी गृहमंत्रालयावर नाराजी व्यक्त केली असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे कालपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi) धुसफूस सुरु असून मृहमंत्री खाते शिवसेनेकडे (Shivsena) देण्यात याव्यात अशा चर्चा सुरु आहेत. यावर भाजपचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांनी प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. मुख्यमंत्रीपद असलेल्या शिवसेनेला आता गृहविभाग हवा, हे ऐकून आश्चर्य वाटल्याची प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली आहे. (Sudhir Mungantiwar on Shivsena)
राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मुख्यमंत्रीपद हवे हे माहीतच आहे. आता अदलाबदल होते का, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे. शिवसेनेला गृहविभाग भाजपवर (BJP) सूड उगवण्यासाठी हवाय कल्याणासाठी नको, उद्धव ठाकरे यांचा हात शरद पवार यांनी बळजबरीने वर केला. त्यामुळे हे जबरदस्तीचे मुख्यमंत्री असल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली.
हे सरकार जनतेला दिलासा देण्याऐवजी केवळ घोषणा करत आहे. हे सरकार गृहमंत्रालय हाती घेऊन काय करणार, असा सवालही त्यांनी यावेळी केला. सर्व तपास यंत्रणा मुख्यमंत्र्यांच्या कार्यकक्षेत असताना पुन्हा गृहविभाग हवाच कशाला, असा प्रश्न विचारत ही स्थिती नाचता येईना अंगण वाकडे, अशी असल्याचा घणाघात मुनगंटीवार यांनी केला.
शिवसेना, काँग्रेस गृहखात्यावर नाराज?
महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेस गृह खात्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. काल मंत्री मंडळाच्या झालेल्या बैठकीतही या खात्यावर मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Delip Walase Patil) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. ही भेट नाराजीवर असल्याचे बोलले जात आहे.
माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास : उध्दव ठाकरे
कॅबीनेटच्या बैठकीमध्ये मंत्र्यांनी गृहमंत्रालयावर नाराजी व्यक्त केली असल्याचे बोलले जात होते. तसेच कालपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi) धुसफूस सुरु असून मृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नाराज असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. या बातम्यांचे उध्दव ठाकरे यांनी खंडण केले आहे. नाराज असल्याची माहिती चुकीची आहे. माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे, आणि ते उत्तम काम करीत आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट केले आहे.
Edited By- Santosh Kanmuse
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.