Success Story
Success StorySaam Tv

MPSC : लेकींनी नाव कमावलं, गॅरेजवाल्याच्या दोन्ही मुली झाल्या सरकारी अधिकारी; मंत्रालयात पोस्टिंग; सोलापूरात होतंय कौतुक

Solapur Girls Crack MPSC Success Story: सोलापूरच्या संजिवनी आणि सरोजिनी भोजने यांनी एमपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. या दोघींची मंत्रालयात अधिकारी म्हणून पोस्टिंग झाली आहे.
Published on

घरची आर्थिक परिस्थितीमुळे पाचवी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या वडीलांनी छोट्या गॅरेज व्यवसायावर सहा माणसाचं कुटुंब चालवत दोन मुलींना शिक्षण दिल. त्यामुळे सोलापूरच्या गवळी वस्ती सारख्या झोपडपट्टीत पत्र्याच्या घरात अभ्यास करुन दोन सख्या भगिनींनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे.

Success Story
Success Story: रिझर्व्ह बँकेत HR, लंच ब्रेकमध्ये अभ्यास; कोणत्याही क्लासेसशिवाय पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सृष्टी डबास यांचा प्रवास

संजीवनी आणि सरोजिनी भोजने अशी एमपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या त्या दोन सख्ख्या भगिनींची नावे आहेत.तर गरीब परिस्थितीतून मुलींना शिक्षण देणारे ज्योतीराम आणि रेश्मा भोजने अशी आई-वडिलांची नावे आहेत.

जोतिराम भोजने यांनी पाचवी पर्यंत शिक्षण घेतले असून गॅरेज चालक अशी वडीलांची ओळख आहे.घरची गरीब स्थिती असताना देखील वडिलांनी शिक्षण शिकवल्यानेच हे यश मिळाले असल्याच्या भावना संजीवनी आणि सरोजिनी यांनी व्यक्त केल्या आहेत.

घरची परिस्थिती हलाखीची असतानाही दोघी भगिनींनी बीकॉम पर्यंत शिक्षण पूर्ण केले.2018 पासून दोन्ही भगिनींनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली आहे.दररोज किमान 6 ते 7 तास सोलापुरात अभ्यास करुन त्यांनी या परीक्षेत यश मिळवलय.काल महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचा निकाल हाती आल्यानंतर त्यांना ही आनंदाची बातमी समजली.

Success Story
Success Story: आईचे छत्र हरवलं, २ वेळच्या जेवणाचेही वांदे; हार मानली नाही, पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक, IAS गोविंद जयस्वाल यांची संघर्ष गाथा

यामध्ये संजीवनी भोजने यांना मंत्रालयात महसूल सहाय्यक तर सरोजणी भोजने यांना कर सहाय्यक पोस्टिंग मिळाली आहे.त्यामुळे सध्या भोजने कुटुंबियांचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे.अतिशय हलाकीच्या परिस्थितीतून या दोन भगिनींनी मिळवलेल्या या दैदीप्यामान यशाच सोलापूरमध्ये सर्वत्र कौतुक होत असल्याच चित्र दिसून येत आहे.

Success Story
Success Story: नोकरी करताना UPSC ची तयारी; तिसऱ्याच प्रयत्नात यश; IAS सर्जना यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com