Success Story: शहापूरच्या लेकीची गरुडझेप! थेट ISRO मध्ये शास्त्रज्ञ म्हणून रुजू

Success Story Of Shahapur Girl Join ISRO: शहापूरच्या लेकीने गगनभरारी घेतली आहे. सुजाताची इस्त्रोत शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. तुम्हाला सरळ मार्गानेच यश मिळवता येते. त्यासाठी खूप जास्त मेहनत आणि अभ्यास करावा लागतो. असंच काहीसं शहापुरच्या सुजाताने केलं आहे. तिने मोठी झेप घेतली आहे. तिने इस्त्रोत शास्त्रज्ञ म्हणून नोकरी मिळवली आहे.

ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील शिरगांव या लहानशा गावातील सुजाताची ही गरुडझेप ठाणे जिल्ह्यात कौतुकाचा विषय बनला आहे.सुजाता रामचंद्र मडके हिची इंडियन रिसर्च सेंटर (इस्रो) मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे.सुजाताच्या संशोधनातून ठाणे जिल्ह्याचा झेंडा आता इस्रोमध्येही झळकणार आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे येथील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाचा राजीनामा देऊन भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( इस्रो ) बेंगलुर (कर्नाटक) येथे शास्रज्ञ (राजपत्रित अधिकारी) या पदावर सुजाता रुजू झाली.

Success Story
Success Story: दहावीत काठावर पास, स्पर्धा परीक्षेत १० वेळा अपयश, अखेर UPSC क्रॅक केलीच; IAS अवनीश शरण यांचा प्रवास

सुजाताचे शिक्षण

इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण शिरगांव जिल्हा परिषद शाळेत झालेल्या सुजाताचा प्रेरणादायी प्रवास आहे.सुजाताने शहापूर येथील ग. वि.खाडे विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण करुन नंतर तिने भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आयआयटी) खरगपूर येथे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या कार्यक्रमांतर्गत व्हर्च्युअल लॅब प्रोजेक्ट -३ मध्ये रिसर्च इंजिनिअर म्हणून काम केले आहे.

Success Story
Success Story: मातीच्या दिव्याखाली अभ्यास केला, कोणत्याही कोचिंगशिवाय एकदा नाही तर दोनदा UPSC क्रॅक; IAS अंशुमन राज यांचा प्रवास

ठाणे जिल्हा परिषदेत वरिष्ठ लिपिक पदावर काम करणारे रामचंद्र मडके आणि गृहिणीच्या भुमिकेत असलेल्या आई सविता या दाम्पत्याने आपली भूमिका चोख पार पाडली.यापुर्वी सुजाताची सहाय्यक अभियंता म्हणून महाजेन्को मध्ये निवड झालेली होती.

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) मध्ये सायंटिस्ट - बी पदाच्या मुलाखतीपर्यंत आणि भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी), ट्रॉम्बेच्या टेक्निकल ऑफिसर पदाच्या मुलाखतीपर्यंत तिने धडक मारलेली आहे.तसेच महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षेत यश संपादन करुन प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) ठाणे येथे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदावर कार्यरत होती.

दरम्यान नुकतेच ती भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो),बेंगळुरूमध्ये सायंटिफिक ऑफिसर ( एसओएससी ) या पदावर रुजू झालेली असून तिचे पद पे मॅट्रिक्समध्ये लेव्हल १० इतक्या उच्च दर्जाचे आहे.

Success Story
Success Story: वयाच्या २१व्या वर्षी UPSC क्रॅक; IAS आस्था सिंह कोण आहेत?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com