पोषण आहाराच्या नावावर विद्यार्थ्यांची बोळवण; खिचडी ऐवजी दिली जातायत बिस्किटे!

केंद्र सरकारच्या शालेय पोषण आहार योजनेत विद्यार्थ्यांना खिचडी ऐवजी बिस्किटे दिली जात आहेत. पूर्वी विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात यायची. आता मात्र, तांदूळ न आल्यानं विद्यार्थ्यांची बिस्किटे देऊन बोळवण केली जात आहे.
पोषण आहाराच्या नावावर विद्यार्थ्यांची बोळवण; खिचडी ऐवजी दिली जातायत बिस्किटे!
पोषण आहाराच्या नावावर विद्यार्थ्यांची बोळवण; खिचडी ऐवजी दिली जातायत बिस्किटे!
Published On

नागपूर : केंद्र सरकारच्या शालेय पोषण आहार योजनेत विद्यार्थ्यांना खिचडी ऐवजी बिस्किटे दिली जात आहेत. पूर्वी विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात यायची. आता मात्र, तांदूळ न आल्यानं विद्यार्थ्यांची बिस्किटे देऊन बोळवण केली जात आहे. मात्र, या बिस्किटांनी विद्यार्थ्यांचं पोटच भरत नाही. त्यामुळं पोषण आहाराच्या नावानं विद्यार्थ्यांचं कुपोषण होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारद्वारे शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या आरोग्यास पोषक असलेले अन्न शाळेमध्ये देण्यास सुरुवात करण्यात आली.

हे देखील पहा :

त्यातून राज्यातील सरकारी शाळांसह अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचं वाटप करण्यात येतं. मात्र, कोरोनामुळं शाळा बंद करण्यात आल्यानं विद्यार्थ्यांना धान्याचं वाटप करण्यात आलं. मात्र, आता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. या विद्यार्थ्यांना धान्य देण्याऐवजी पोषक आहार म्हणून तांदूळ, बाजरी, ज्वारी, नाचणी आणि सोयाबीन या कडधान्यावर प्रक्रिया करून पॅकेटबंद बिस्किटे विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले. मात्र, यातून विद्यार्थ्यांची भूक भागत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. असे महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक, शिक्षकेत्तर सेना, प्रदेश सरचिटणीस शरद भांडारकर यांनी म्हटलं आहे.

पोषण आहाराच्या नावावर विद्यार्थ्यांची बोळवण; खिचडी ऐवजी दिली जातायत बिस्किटे!
एसटी कर्मचाऱ्यांनी पावत्यांची होळी करून दिला संघटनेचा राजीनामा

खिचडी बंद केलेली नसून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बिस्किटे भूक भागविण्यासाठी नाही तर सकस आहारासाठी देण्यात येत आली आहेत. असे नागपूरचे शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी म्हणाले. विद्यार्थ्यांना दिली जाणारे ही बिस्किटं महिन्यात एकदाच दिली जातात. विद्यार्थी हि बिस्किटे घरी घेऊन जातात आणि त्यांना हवं तेव्हा खातात. खिचडी शाळेत मिळत असल्यानं विद्यार्थी किमान खिचडीसाठी तरी शाळेत यायचे. मात्र, आता बिस्किटं मिळत असल्यानं विद्यार्थ्यांचं पोटही भरत नाही आणि शाळेत येण्याचं प्रमाणही कमी होतं आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com