Bank Loan : या बँकेत चार महिन्यांपासून कर्ज वाटप बंद; सीडी रेशो ९६.५ टक्क्यांवर

Bank Loan : स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेच्या सभासदांना कर्ज मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या चार महिन्यांपासून बँकेचा सीडी रेशो ९६.५ टक्क्यांवर गेला असून कर्ज आणि ठेवी याचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे कर्ज वाटप बंद आहे.
Bank Loan
Bank LoanSaam Digital
Published On

Bank Loan

स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेच्या सभासदांना कर्ज मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या चार महिन्यांपासून बँकेचा सीडी रेशो ९६.५ टक्क्यांवर गेला असून कर्ज आणि ठेवी याचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे कर्ज वाटप बंद असून राज्याचे सहकार खाते दबावाखाली काम करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेने केला आहे.

एसटी बँकेकडून चार महिने कर्ज वाटप बंद आहे. अशातच बँकेने एक परिपत्रक काढत ७ मार्चपासून पाच हजारांपर्यंत तातडीचे कर्ज वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे; पण ही मदत मर्यादीत असल्यामुळे सभासदांच्या अडचणी वाढल्या आहेत. सध्या लग्नसराई सुरू असून मोठ्या कर्जाची आवश्यकता असताना पैसे नसल्याने तारखा पुढे ढकलण्याची वेळ आली. तसेच आजारपणालासुद्धा पैसे मिळत नसल्याने अशा परिस्थितीत राज्य सरकारच्या सहकार खात्याने हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे; पण वारंवार तक्रारी करूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे बँक आर्थिक अडचणीत सापडल्याचे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bank Loan
Sharad Pawar News: जयंत पाटलांकडून वयाचा उल्लेख, शरद पवारांनी लगेच हटकलं; वाक्यही मागं घ्यायला लावलं... VIDEO

बँकेचे पतपेढीत रूपांतर होण्याची भीती

बँकेतील बेकायदेशीर भरती, व्यवहार, संचालक मंडळाकडून होणारी अनियमितता या बाबतीत अनेक सभासद व बँक कर्मचाऱ्यांचे नेते आनंदराव अडसूळ हे वारंवार सहकार खात्याकडे तक्रारी करीत आहेत; पण सहकार खाते त्यांना दाद द्यायला तयार नाही. सत्ताधारी पक्षाचे नेते असूनसुद्धा अडसूळ यांचे ऐकले जात नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः लक्ष घातले पाहिजे. नाहीतर बँकेतील अनियमितता पाहता चांगल्या बँकेचे रूपांतर पतपेढीत होऊ शकते, अशी भीती सभासदांकडून व्यक्त केली जात आहे.

Bank Loan
Who Is Nilesh Lanke: निलेश लंके कोण आहेत? जे आज दिवसभर आहेत चर्चेत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com